एकता कपूर हि एक लोकप्रिय निर्माती आहे. आणि तिने आता पर्यत अनेक उत्तम मालिकाची निर्माती केली आहे. तसेच आता ती तिची एक मालिका नागिन 7 यातील तांत्रीक अडचणीमुळे चर्चेत आली होती. तर आता एकता कपूरने अक्षय कुमार आणि जितेंद्र यांच्या शिस्तीची प्रशंसा केली. नुकताच अक्षय कुमारचा भुत बंगला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि त्याने आता पर्यत अनेक उत्तम कमाई केली आहे. तर या दरम्यान ‘भूत बंगला’च्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या या निर्मातीने सांगितले की, सातत्याने काम करणारे कलाकार निर्माते आणि क्रूसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण ते त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देतात.
अक्षय कुमारचे (Kumar)दरवर्षी 1 तरी चित्रपट असतो आणि त्यामुळे चित्रपटसृष्टीला उत्तम फायदा होतो. असे निर्मातीने म्हणले आहे. ‘भूत बंगला’च्या यशानंतर एकताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. तिने तिचे वडील जितेंद्र यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल सांगितले आणि त्यांच्या कार्यशैलीची तुलना अक्षय कुमारशी केली. ती म्हणाली की, दोघेही अभिनेता-निर्मात्याची दूरदृष्टी समजून घेतात. तसेच चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा आदर करतात. एकताने लिहिले, “आता सर्वांचे आभार मानण्याची वेळ आली आहे… बाबा आणि अक्षय सरांचा हा फोटो मला आठवण करून देतो की शिस्त काय करू शकते. ते इतके सारखे आहेत की, जेव्हा मी अक्षय सरांशी बोलते, तेव्हा मला माझ्या वडिलांशी बोलत असल्यासारखं वाटतं.
अक्षय कुमार अभिनीत भुत बंगला हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीस खरा ठरला आहे. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी अनेक वर्षाने समोर आल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त होत्या. आणि या चित्रपटाने त्या पूर्ण केल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










