×

दुख:द | दिग्गज मल्याळम अभिनेत्री माहेश्वरी अम्मांचे निधन, ५००हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

ललिता या नावाने ओळखल्या जाणार्‍या दक्षिणेतील अभिनेत्री माहेश्वरी अम्मा (Mahshwari Amma) यांचे निधन झाले आहे. या दिग्गज अभिनेत्रीने त्यांच्या कारकिर्दीच्या ५ दशकात मॉलिवूड आणि कॉलिवुडसह ५०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. ७३ वर्षीय ललिता यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. डिसेंबरच्या सुरुवातीलाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी (२३ फेब्रुवारी) रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला.

केरळमध्ये बुधवारी (२३ फेब्रुवारी) अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. रिपोर्टनुसार, ललिता कामात सक्रीय असूनही त्यांना काही काळापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, मंगळवारी रात्री अभिनेत्री या सर्व समस्यांमधून मुक्त झाल्या. (malyalam actress maheshwari amma aka lalitha passes away)

ललिता यांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी डाव्या विचारसरणीच्या केरळ पीपल्स आर्ट्स क्लबच्या माध्यमातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. खरं तर हा थिएटर एक क्लब आहे. यानंतर १९६९ मध्ये ललिता यांना फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला आणि त्यांनी ‘कोट्टुकुडुडुम्बम’ चित्रपटात काम केले. केएस सेतू माधवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

ललिता १९६९ पासून कामात सक्रिय होत्या आणि त्या जवळपास ५ दशकांपासून कार्यरत होत्या. मल्याळम व्यतिरिक्त ललिता यांनी इतर अनेक भाषांमध्येही काम केले आहे. अभिनेत्री अधिक कौटुंबिक भूमिका साकारत असे. आई, बहीण आणि मुलगी या पात्रांमध्ये त्या चांगल्याच पसंत केल्या जायच्या. याशिवाय त्यांची कॉमेडीही प्रेक्षकांना खूप आवडायची.

पुरस्कार
ललिता यांना १९९० आणि २००० साली ‘अमरम’ आणि ‘शांतम’ या चित्रपटांसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

वैयक्तिक जीवन
ललिता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी चित्रपट दिग्दर्शक भरथनशी लग्न केले. १९९८ मध्ये दिग्दर्शकाचे निधन झाले. ललिता यांना एक मुलगा सिद्धार्थ आहे जो अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.

हेही वाचा :

Latest Post