×

अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटातच ट्रेलरने घातली प्रेक्षकांना भुरळ

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालू होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. या आधी या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झाला होता. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू , भारत गणेशपुरे हे कलाकार दिसत आहे. एका गावाच्या ठिकाणी तरुण नको त्या व्यसनी गोष्टींना बळी पडून आपले आयुष्य खराब करत असतात. परंतु अमिताभ बच्चन हे कशाप्रकारे त्यांचे हे दुर्गुण बाजूला करून त्यांना सद्गुणांच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात हे या ट्रेलरमधून दिसत आहे.

मुलांना अगदी आपल्या देशाचे नाव भारत आहे हे देखील माहित नसते. तेव्हाच अमिताभ बच्चन हे घोषणा करतात की, ही आपल्या भारताची नॅशनल फूट बॉल टीम असणार आहे. तरुण मुलांमध्ये कितीही अवगुण असेल, तरी देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यात असणारी जिद्द आहे ताकद बघितलेली असते. आकाश ठोसर देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच रिंकू राजगुरू हिची देखील ट्रेलरमध्ये झलक पाहायला मिळाली आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे.

‘झुंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन अगदी काही मिनिटेच झाले आहे. तरी देखील या चित्रपटाला आतापर्यंत ३४ हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. तसेच प्रेक्षक हा कमेंट करून ट्रेलरचे कौतुक देखील करत आहेत. चित्रपटाला मराठीतील सुपरहिट संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.

‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे हे मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत आहेत. याआधी त्यांच्या ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’ या चित्रपटांनी सर्वत्र धमाल केली आहे. ‘सैराट’ चित्रपटात देखील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत होते. आता त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. चाहते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

 

 

 

Latest Post