Friday, April 19, 2024

भारीच ना! ७३व्या एमी पुरस्कारांची झाली घोषणा, ‘द क्राउन’ने मारली बाजी

मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, इतकेच नव्हे, तर आर्थिक सुविधा देखील बंद झाल्या होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने पुन्हा सर्व सुरू होतं आहे. याच दरम्यान ७३ व्या एमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये, ‘द क्राउन’ ला अनेक श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. ज्यामध्ये सर्व प्रमुख नाटक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकून चित्रपटाने धमाल केली.

‘द क्राउन’ने सर्वोत्कृष्ट नाटक मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता असे प्रमुख पुरस्कार जिंकले. याच्या व्यतिरिक्त ‘द क्राउन’च्या लेखक आणि दिग्दर्शकालाही सर्वोत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन पुरस्कार मिळाला आहे. शिवाय ‘टेड लास्सो’ला १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. या शोने या वर्षीच्या कार्यक्रमात जबरदस्त कामगिरी केली आहे. हा पुरस्कार सोहळा अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील इनडोअर-आउटडोअर ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वर्षीच्या विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे. (emmy awards 2021 winners list ted lasso and the crown win trophies)

एमी पुरस्कार विजेते २०२१

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विनोदी मालिका : हन्ना वडिंघम (टेड लास्सो)

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विनोदी मालिका : ब्रेट गोल्डस्टीन (टेड लास्सो)

ऍंथॉलॉजी मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ज्युलिएन निकोलसन (मेअर ऑफ ईस्टटाउन)

ऍंथॉलॉजी मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : इवन पीटर्स (मेअर ऑफ ईस्टटाउन)

नाटक मालिकेचे उत्कृष्ट लेखन : पीटर मॉर्गन (द क्राउन)

नाटक मालिका उत्कृष्ट दिग्दर्शन : जेस्सिका हॉब्स (द क्राउन)

नाटक मालिका उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : गिलियन अंडरसन (द क्राउन)

नाटक मालिका उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : टोबिज मेंझीज (द क्राउन)

उत्कृष्ट मुख्य अभिनेत्री (कॉमेडी): जीन स्मार्ट

उत्कृष्ट मुख्य अभिनेता (कॉमेडी): जेसन सुडेकिस

विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट लेखन: लुसिया, पॉल आणि जेन स्टॅस्की (हॅक्स)

विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शन: लुसिया (हॅक्स)

विनोदी मालिका लेखक : हॅक्स

व्हरायटी टॉक मालिका: लास्ट वीक टुनाइट विद जॉन ऑलिव्हर

टेलिव्हिजन चित्रपट : डॉली पार्टन क्रिसमस ऑन द स्क्वायर

एम्मी अवॉर्ड्स हा टेलिव्हिजन अकादमीने दिलेला सर्वोच्च सन्मान मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून या शोला ऑस्कर आणि ग्रॅमी अवॉर्ड्स सारखाच आदर दिला जात आहे. मागील वर्षी कोरोनामुळे एमी पुरस्काराचा एक व्हर्चुअल समारंभ होता. सर्व विजेत्यांच्या ट्रॉफी त्यांच्या घरी पोहोचवण्यात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

-‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

हे देखील वाचा