Thursday, July 18, 2024

सलमान खानच्या ‘दगाबाज’ गाण्यावर थिरकला त्याचा बॉडीगार्ड शेरा, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (salman khan) बॉडीगार्ड आहे. परंतु शेरा आणि सलमान यांचं वेगळाच बॉण्डिंग बघायला मिळत. शेरा सलमान खानची सगळी सुरक्षा बघतो. त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतो तर दुसरीकडे सलमान आपला बॉडीगार्ड शेरावर तेवढंच प्रेम करतो. शेरा इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. याच्याविरुद्ध सलमान खान इंस्टाग्रामवर एवढा सक्रिय दिसत नाही. शेरा सध्या राजस्थानमध्ये जसलमेर येथे आहे. तिथल्या फोक डान्सरबरोबर तिथल्या राजस्थानी गाण्यावर ती डान्स करत असताना दिसला आहे.

शेरा राजस्थान जैसलमेरमध्ये काही राजस्थानी फोक डान्सरबरोबर त्यांच्या गाण्यावर त्यांच्या तालावर नाचत होता. गाणी आणि डान्स खूप एन्जॉय करत होता आणि त्यांनी जेव्हा सलमान खानचं ‘दगाबाज’ गाणं गुणगुणायला सुरुवात केली तेव्हा त्या गाण्यावर ती शेरा स्वतःला थांबवू शकला नाही. या गाण्यावर त्याने मनापासून त्याने डान्स केला.

शेरा आणि सलमान त्या दोघांची वेगळीच केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. सलमान खान आणि त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगत असताना शेरा म्हणतो की, “मी सलमान खानला तेव्हा भेटलो जेव्हा मी खूप फेमस सिंगर ‘विंगफिल्ड’ची सिक्युरिटी बघत होतो. त्यानंतर सलमान खानबरोबर दुसरी भेट म्हणजे जेव्हा कियानू रीवीस भारतात आले होते. ‘स्पीड’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि मॅट्रिक्स रिलीज होणार होता. पहिल्यांदा मी सलमान खानसाठी चंदिगडमध्ये काम केलं. त्यानंतर मी आतापर्यंत त्याच्यासाठी काम करत आहे. यातून त्या दोघांमध्ये असलेले बॉण्डिंग आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा :

हे देखील वाचा