भन्नाटच! अभिनेत्री ईशा गुप्ताने केले एका पेक्षा एक कठीण योगासने; लवचिकता पाहून तुम्हीही व्हाल थक्क


आजकाल बॉलिवूड स्टार्स आणि सोशल मीडिया हे एक समीकरणचं झाले आहे. प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील घटना सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातच अभिनेत्री ईशा गुप्ता देखील तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा बोल्डनेस आणि अभिनयामुळे जेवढी चर्चेत असते, तेवढीच ती अजून एका गोष्टीमुळे चर्चेत असते. ती गोष्ट म्हणजे ‘फिटनेस’ होय. तिने सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची लवचिकता दिसत आहे.

ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही योगा करताना फोटो शेअर केले आहे. तिने खूपच अवघड योगासने केली आहेत. तिची ही लवचिकता पाहून तिचे चाहतेही थक्क होत आहेत.

ईशाला योगा खूप आवडतो. या फोटोमध्ये तिचे स्ट्रेचिंग स्किल दिसत आहे. ती नेहमीच असे योगा करताना फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिची ही स्टाईल खूप आवडते.

चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट करत असतात. ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ईशा गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘जन्नत 2’, ‘रेस 3’, ‘रुस्तम’, ‘कमांडो 2’, ‘बादशाहो’, ‘टोटल धमाल’, ‘हमशकल’ यांसारख्या चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळीच छाप निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.