Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड कर्कराेगावर मात करून वयाच्या 63व्या वर्षीही संजय दत्त तरुणांना देताे टक्कर, एकदा पाहाच व्हिडिओ

कर्कराेगावर मात करून वयाच्या 63व्या वर्षीही संजय दत्त तरुणांना देताे टक्कर, एकदा पाहाच व्हिडिओ

संजय दत्त हा बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच कर्करोगावर मात करून पुनरागमन करणारा संजय दत्त आता आपल्या एॅग्रेसिव वर्कआउटने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये 63 वर्षीय संजय दत्त आपल्या बॉडीवर मेहनत घेत आहे.

संजय दत्त (sanjay dutt) याने शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी)ला दुपारी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो ब्लॅक जिम वेअरमध्ये अतिशय एॅग्रेसिव वर्कआउट करताना दिसत आहे. यादरम्यान त्याचा ट्रेनरही त्याच्यासोबत दिसत आहे. संजयला वर्कआउट करताना पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संजयने लिहिले की, ‘प्रत्येक दिवस मजबूत’. यासोबतच त्यांनी ‘दत्तस द वे’ हा हॅशटॅग वापरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

काही काळापूर्वी कर्करोगावर मात करून संजय दत्त परतला आहे. अशा परिस्थितीत त्याला असे वर्कआउट करताना पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळत आहे. संजय दत्तच्या वर्कआउटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांतच या व्हिडिओला भरपूर लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यांनी कमेंट करत लिहिले की, ‘प्रेरणा’. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘या जंगलात एकच सिंह आहे… लव्ह यू बाबा’. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मला तुझा हा दृष्टिकोन खूप आवडला. नेहमी प्रेरणादायी.’

या आठवड्याच्या सुरुवातीला संजय दत्तने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो जिममध्ये दिसत होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘तुमच्या मनाच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तने यावर्षी ‘मुन्नाभाई एमबीबीएस 3’ ची घोषणा केली आहे. 2023मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात संजय दत्त अर्शद वारसी सोबत दिसणार आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. संजय दत्तने 26 जानेवारीला एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली.(even at the age of 63 after defeating cancer actor sanjay dutt is giving competition to youngsters )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा