‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी


अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारच्या आठवणी विसरण्यासाठी नऊ वर्षे लागली. सन २००० मध्ये ती अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती. ‘धडकन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षयच्या दुसर्‍या नात्याबद्दल तिला कसे कळले, याचा अभिनेत्रीने खुलासा केला. शिल्पाने अक्षयसोबतचे आपले संबंध तोडण्याची घोषणा केली, तेव्हा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. आपले तुटलेले हृदय घेऊन बराच काळ भटकत राहिलेल्या शिल्पा शेट्टीला, लंडनमधील सात समुद्रा पार रिपु सुदान कुंद्रा ही जखमांवर मलम लावणारी पहिली व्यक्ती सापडली. शिल्पा शेट्टी आणि रिपू सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांची प्रेमकथा एका परफ्यूम डीलने सुरू झाली होती. हा परफ्यूम शिल्पाच्या नावाने लाँच करण्यात आला होेता आणि त्याचे नाव एस २ असे ठेवले गेले, याच डीलसाठी पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. शिल्पाला पहिल्याच भेटीत वाटले होते की, हा व्यक्ती तिचा जीवनसाथी असू शकतो.

सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत राज कुंद्राचा समावेश

त्या काळात ब्रिटनमधील २०० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत राज कुंद्राचा समावेश होता. मात्र जेव्हा शिल्पा शेट्टीला समजले की, त्याचे आधीच लग्न झाले आहे, तेव्हा ती मनातून खूप दु: खी झाली. पण, राज कुंद्रा शिल्पाच्या प्रेमात वेडा झाला होता. तेव्हा शिल्पाला हे माहित नव्हते की, राज कुंद्राने त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाची बोलणी सुरू केली होती. याची माहिती तिला तेव्हा मिळाली, जेव्हा ती ‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोच्या शूटिंगसाठी काही काळानंतर पुन्हा लंडनला आली होती. हा शो सुरू होण्याच्या काही काळा आधी शिल्पा एका अशा हॉटेलच्या शोधात होती, जिथे तिला हॉटेलचा मोठा खर्च वाचवता येईल. राज कुंद्राने तिला स्वतःची जागा ऑफर केली, जिथे तो विश्रांतीसाठी जात असे. इथेच दोघे पहिल्यांदा निवांत भेटले. यावेळी ते जगापासून पूर्ण वेगळे झाले आणि तेव्हा त्यांना समजले की दोघांच्या मनात सारख्याच भावना आहेत. (everything you wanted to know about raj kundra shilpa shetty love story)

नात्याची सुरुवात
त्या वेळेस शिल्पाचे लंडनला सारखे जाणे येणे चालू होते, त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले. २००७ मध्ये स्वत: शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या तिच्या प्रेमाबद्दल कबुली दिली. ती म्हणाली, “खूप बर वाटतं, जेव्हा कोणी आपली खूप काळजी घेतं. अनेक दिवस एकटे घालवल्यानंतर हे बघून आनंद वाटतो, की कोणीतरी आहे ज्याच्यासोबत मी माझे आयुष्य आनंदाने जगू शकते.” तेव्हा तिचा इशारा राजकडेच होता. त्यावेळेस शिल्पा ‘लाईफ इन अ मेट्रो ‘ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासू यांनी तिला ‘बिग ब्रदर’ या कार्यक्रमास हजेरी लावण्याची अनुमती दिली होती. त्या चित्रपटातील एक गाणं ‘इन दिनों’ हे शिल्पाच्या मोबाइलमध्ये होतं. राजला ते गाणं आवडलं आणि मग पुढचे कितीतरी दिवस ते गाणे शिल्पाने मोबाईलच्या रिंगटोनसाठी ठेवले होते.

जलसा समोर विकत घेतला संपूर्ण मजला 
जेव्हा राज कुंद्राची शिल्पा शेट्टीशी भेट वाढली, तेव्हा ते दोघे एकमेकांना समजू लागले. राज कुंद्रा शिल्पा शेट्टीला सतत गिफ्ट्स देत असे. पण, एका गोष्टीने शिल्पाचे मन जिंकले, ते म्हणजे त्याने अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरच्या इमारतीत संपूर्ण मजला खरेदी करून तिला भेट दिला. असे नाही की, राज कुंद्राने शिल्पाला हे एकच घर दिले आहे. असे म्हणतात की, राजने शिल्पाच्या नावावर दुबई, कॅनडा, लंडन आणि अगदी नोएडा येथे घरे खरेदी केली आहेत. कॅनेडियन घर राजवाड्यासारखे आहे आणि असे म्हणतात की, त्याची किंमत कोट्यवधी डॉलर्समध्ये आहे.

नात्यातील सर्वात स्वस्त भेट वस्तू
पण, एवढे करूनही राज कुंद्राने या नात्यातील सर्वात स्वस्त गिफ्ट दिले ते म्हणजे, शिल्पाला प्रेमाची कबुली देताना त्याने केवळ ५ कॅरेट हिऱ्यची अंगठी भेट दिली. आयफा पुरस्कार त्यावर्षी यॉर्कशायरमध्ये होणार होता आणि तिथेच राजने शिल्पाला डिनरमध्ये प्रपोज केले. केवळ पाच कॅरेटची अंगठी पाहून त्वरित या प्रस्तावाला होकार न देण्याचे शिल्पानेही मान्य केले आहे. राज कुंद्रा विवाहित आहे, हे शिल्पा शेट्टीला नात्याच्या सुरुवातीपासूनच माहित होते. राज कुंद्रा आणि कविता यांचे २००३ मध्ये लग्न झाले आणि २००६ मध्ये त्यांची मुलगी डेलिना अवघ्या दोन महिन्यांची असताना त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कविताने शिल्पावर नवरा हिसकावण्याचा आरोपही केला आणि बऱ्याच वर्षानंतर राजने कविताच्या चरित्रावर संशय घेऊन तिला दोषी ठरवले.

खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये लग्न
शेवटी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २२ नोव्हेंबर २००९ रोजी लग्नाची गाठ बांधली. त्यावेळी दोघेही ३४ वर्षांचे होते. दोघांच्या वयोगटातील फरक फक्त तीन महिन्यांचा असल्याचे सांगितले जाते. लग्नापूर्वी शिल्पाने खंडाळ्यातील तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या फार्महाऊसवर मोठी पार्टी दिली होती आणि दोघांचेही लग्न याच फार्महाऊसवर झाले होते. यात्या महिनाभरापूर्वीच या दोघांनी राजच्या जुहू बंगल्यात साखरपुडा केला होता.

२४ नोव्हेंबरला या दोघांनी रिसेप्शन पार्टी दिली. लग्नानंतर दोघे बहामासला हनिमूनसाठी गेले होते आणि दोघांनी तिथल्या सर्वात महागड्या अटलांटिस रिसॉर्टमध्ये बराच वेळ एकत्र घालवला. २१ मे २०१२ रोजी शिल्पा आणि राज यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. या मुलाचे नाव वियान राज असे ठेवले गेले. गेल्या वर्षी शिल्पाने सरोगसीच्या मदतीने एका मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव त्यांनी समीशा नाव ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.