टेलिव्हिजन विषयामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे रामानंद सागर यांची ‘रामायण’ आहे तर ही सिरीयल इतकी गाजली की आजही लोक या सिरीयल मधील साकारलेल्या अभिनेत्यांना विसरू शकत नाही तसेच यातील ज्या ज्या देवाची भुमिका साकरलेले अभिनेते आहेत त्यांना आजही प्रेक्षक देवा सारखे मानतात. तर या मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध टीव्ही अभिनेते सुनील लाहरी यांनी यांच्या सोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे.
सुनील (sunil)लाहरी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “जय श्री राम, मला तुम्हा सर्वांसोबत एक खूपच रंजक गोष्ट शेअर करायची आहे, ज्यामुळे मला ‘रामायण’च्या चित्रीकरणाच्या दिवसांची आठवण झाली. अलीकडेच, कोणीतरी नातेवाईक असल्याचा दावा करत आमच्या इमारतीत मला भेटायला आले होते. जेव्हा आमच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची तपासणी केली, तेव्हा तो खोटे बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी त्याला हाकलून लावले.”
अजुन एक किस्सा सांगत ते म्हणाले तेव्हा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘नमस्कार मला सुनील लाहिरींना भेटायचे आहे.’ मी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहेत, आणि ते म्हणाले, ‘मी त्यांचा भाऊ आहे. मी भोपाळचा आहे.’ आजही हे आठवून माझ्या चेहऱ्यावर हसू येते. पण त्यांनी मला ओळखले नाही. ते स्वतःची ओळख माझा भाऊ म्हणून करून देत होते. तर असे म्हटले जाते की योग्य वेळ आल्यावर अनोळखी लोकही आपले नातेवाईक बनतात. व्वा, जग, किती अद्भुत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
8 एपिसोडची या स्पाय थ्रिलर सीरिजचा, 8.6 रेटिंगसह ओटीटीवर आहे 6 वर्षांपासून कायम दबदबा


