‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये सदस्य आता जवळपास ९ आठवडे राहिले आहेत आणि आता १० वा आठवडा सुरू झाला आहे. आपल्या परिवारापासून दूर, कोणताही संपर्क न साधता बिग बॉसच्या घरामध्ये तब्बल ६५ दिवसांहून अधिक दिवस राहणं काही सोप्पं नाहीये. म्हणूनच हा आठवडा सदस्यांसाठी त्यांच्या या प्रवासावातील अविस्मरणीय आठवडा ठरणार आहे.
यामागील कारण म्हणजे, फॅमिली वीक सुरू होत आहे. सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवारातील सदस्य येणार आहेत. या दिवसाची वाट सदस्य खूप दिवसांपासून बघत असतात. घरातील सदस्य भेटून गेल्यावर पुन्हा जोमाने खेळण्याची उभारी, नवी ऊर्जा मिळते, असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शब्द त्यांना हिंमत देऊन जातात. (Family Week Started In Bigg Boss Marathi 3)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना ‘बिग बॉस’ फ्रीज होण्याचा आदेश देत आहेत. तुम्हाला तर कळलंच असेल आता काय होणार आहे. सदस्यांची अखेर त्यांच्या कुटुंबीयांशी भेट होणार आहे. विकासला भेटायला त्याची बायको घरामध्ये जाणार आहे. गायत्री, विशाल यांना अश्रू अनावर होतात.
यादरम्यान स्पर्धक विकासही त्याच्या मुलाची चौकशी करतो. आता अजून काय- काय गप्पा मारल्या, कोणत्या गोष्टी शेअर केल्या, बायकोने त्याला काय संदेश दिला हे आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न
-‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले ‘नॉकआउट’ नॉमिनेशन कार्य, कोण होणार या आठवड्यात नॉमिनेट?