राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन चर्चेत आहे. या आंदोलनाला अभिनेते किरण माने पाठिंबा देत आहेत. त्यांनी या आंदोलनाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकार आणि मराठा आंदोलनावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. माने यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक त्यांना पाठिंबा देत आहेत तर काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. माने यांच्या या पोस्टमुळे आंदोलन आणखी तापण्याची शक्यता आहे.
किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्ट करताना लिहिले की, “विरोधात साधी पोस्ट केली तरी अकाऊंट रिस्ट्रीक्ट होतं. जाब विचारणार्या पत्रकारांच्या नोकर्या जातात. कलाकारांना बायकॉट केलं जातं. अशा दडपशाहीच्या काळात, संविधानिक मार्गाने एक आंदोलन होतंय आणि त्याने सत्ताधार्यांना हलवून सोडलंय… हे खूप आशादायी आहे, एवढं जरी तुम्हाला कळत नसेल, तुम्ही मराठा आंदोलनावर जहरी टीका करुन फॅसीस्ट शक्तींना बळ देत असाल तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात,” तसेच त्यांनी एक मराठी लाख मराठी असा हॅशटॅग देली वापरला आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले की, “शत्रू कावेबाज असताना कशावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं घातक ठरू शकतं. जाळपोळ करणारे नक्की कोण आहेत? ते ठराविक ठिकाणीच हिंसा करत असतील तर त्यामागे काय हेतू असू शकतो? यामागचा कारण-कार्य-संबंध जाणून घ्यायला हवा. पिसाळलेला हत्ती दिसेल ते उद्ध्वस्त करतो. ठरवून विशिष्ट ठिकाणी जाऊन तोडफोट करत नाही. सावध राहून शत्रूची चाल ओळखा,”
किरण माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. किरण माने यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्यांच्या पात्राचे प्रचंड कौतुक झाले. सध्या ते ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधी’ची या मालिकेत काम करत आहेत. (Famous actor Kiran Mane post about Maratha reservation)
आधिक वाचा-
–‘सत्यशोधक’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
–शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; अभिनेता हात जोडून म्हणाला…