Monday, October 2, 2023

चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! रस्त्यावर आढळला दिग्गज अभिनेत्याचा मृतदेह, सिनेविश्वात खळबळ

सिनेसृष्टीतून एक काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. मृत्युव झालेल्या अभिनेत्याचे नाव मोहन आहे. ते तमिळ अभिनेते आहेत. त्यांनी 80च्या दशकात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मोहन यांनी वयाच्या 60व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी (4 ऑगस्ट) सापडला आहे.

मदुराईतील तिरुपरकुंडम मंदिराजवळील रस्त्यावर अभिनेत्याच्या मृतदेह आढळून आला आहे. आर्थिक परिस्थितीचा सामना करत असलेल मोहन (Mohan) कामाच्या शोधात होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेत्याचा मृतदेह रस्त्यावर सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मोहन यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुपरस्टार कमल हासनसोबत चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते मोहन यांचे निधन झाले आहे. 1989 मध्ये अपूर्व सगोधरार्गल या चित्रपटात त्याने कमल हासनच्या मित्राची भूमिका केली होती. त्यानंतर ते कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसला नाही. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांच्या पत्नीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती.

मोहन अशा आर्थिक संकटाचा बळी गेले होते की, ते रस्त्यावर भीक मागून जगत होते. ते रस्त्यावर मृतावस्थेत पडलेले पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अभिनेत्याची प्रकृती इतकी वाईट होती की, त्यांना कोणीही ओळखू शकत नव्हते. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी रूग्णालयाच दाखल केला.

या प्रकरणाची चौकशी केली असता हा अभिनेते मोहन असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही आणि मोहनची तब्येत बिघडल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मोहनचा मृतदेह सालेम येथे नेण्यात येईल, जिथे त्याचा जन्म झाला होता. अभिनेत्याला पाच बहिणी आणि दोन भाऊ आहेत. तमिळ अभिनेता मोहन यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. (famous Actor Mohan, who worked with Kamal Haasan, passed away)

अधिक वाचा- 
वेतन समानतेवर काजोलने मांडले मत; म्हणाली, ‘भारत प्रगती करत आहे, पण…’
जरा इकडे पाहा! गुलाबी रंगात खुलले आलियाचे सौंदर्य

हे देखील वाचा