Saturday, September 30, 2023

‘दादूस लई झ्याक दिस्तोयास…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही सतत सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध पोस्ट करतात. यामध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता संतोष जुवेकरचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. संतोष सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असतो. त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत असतात.

संतोषने (santhosh juvekar) एक व्हिडिओ शेअर केला आहे. संतोषने मोरया चित्रपटातील एका गाण्यावर रील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात संतोषने त्याचे काही फोटो कोलाज केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियार चांगलाच धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

पोस्ट शेअर करताना संतोषने लिहिले की, “साला आपल्या रीलवर आपल्याच सिनेमाचं आपलंच गाणं लावायची मज्जाच आणि माजच काही और आहे. बाकी ही सगळी मज्जा आणि माज फक्त तुम्हां सर्वांच्या आणि त्या बाप्पाच्या आणि भोले बाबाच्या जीवावर आणि आशिर्वादावर आहे. खूप दिवसांनी New look with सफाचट. Hope तुम्हाला आवडेल, सांगा आवडला तर आणि नाही आवडला तर सोडा……मला आवडलाय….. बास्स्स्स्स्स.”

संतोषच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “दादूस लई झ्याक दिस्तोयास… मंजी नादखुळा.” दुसऱ्याने लिहिले की, ‘लव यु… येऊ दे नविन चित्रपट आपला…फुल ऑन राडा… आम्ही वाट पाहतोय तुझ्या चित्रपटाची.” तर काहीनी ‘मोरया 2’ चित्रपट कधी येणार आहे असे विचारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

संतोष जुवेकर विषयी बोलायच झाले तर, संतोषने ‘मोरया’, ‘रेगे’, ‘झेंडा’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये दमदार कामगीरी केली आहे. संतोष जुवेकरने मराठी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार लूक, रांगडा अभिनय यामुळे संतोषला चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. (Famous actor Santosh Juvekar’s video viral on social media)

अधिक वाचा- 
पावसात आनंद लुटताना दिसले प्रिया बापट आणि उमेश कामत; चाहते म्हणाले, “तुमची जोडी…”
नात्याचा अर्थ शिकवणारा ‘जर्नी’ चित्रपट लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला, ‘हे’ बालकलाकार मिळणार पाहायला

हे देखील वाचा