Friday, December 8, 2023

मराठी सिनेमाच्या निर्मात्याने शशांक केतकरचे थकवले लाखो रुपये; अभिनेता म्हणला, ‘योग्य क्षणी…’

‘होणार सून मी या घरची’ मालिकेनंतर तर शशांक केतकरला अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी आणि ओळख प्राप्त झाली. मालिकांसोबत तो नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील सक्रिय असतो. सध्या टेलिव्हिजनवर तो तुफान गाजत असलेली मालिका ‘मुरंबा’ मध्ये काम करत आहे. मालिकेतील रमा आणि अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

मालिकेमध्ये सेक्रिय असणारा शशांक ( Shashank Ketkar ) सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत विविध विषयांवर आपले मत मांडत असो. तो त्याच्या बोलण्यातून लोकांचे लक्ष वेधून घेतो. कामासोबतच तो सामाजिक मुद्द्यावर देखील त्याचे मत मांडत असतो. सध्या शशांक त्याच्या अशा एका पोस्टमुळे चांगलंच चर्चेत आला आहे. नुकतीच शशांकने एक सोशल मीडियावर लांब लचक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

शशांकने पोस्ट करताना लिहिले की, ” मी एका प्रोडक्शन हाऊसबरोबर काम केले आहे. पण त्यांनी माझे माधन दिले नाही. त्यांनी माझे माधन थकवले आहे. मला त्यांनी …लाख रूपये देण्याचे वचन दिले होते. बरेच महिने झाले मी त्या चीट प्रोडक्शन हाऊसचा पाठपुरावा करत आहे आणि ते लोक मला प्रत्येक वेळी वेगवेगळी अश्वासन देत आहेत. हा एक मराठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. ज्याचे नाव इंडस्ट्रीत मोठी आहे. त्या अनेक बड्या स्टाररने काम केले आहे.

पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना पहिल्या 20% फी देखील मिळालेली नाही. माझ्या आणि निर्मात्यांमध्ये घडलेला सर्व तपशील आणि सर्व संवाद योग्य क्षणी बातम्या आणि मीडिया चॅनेलवर शेअर केला जातील. गमतीचा भाग हा आहे की, एखाद्याकडे अभिनय कौशल्य नसते तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही… मग त्याच्याकडे पैसा नाही त्याला निर्माता कसे काय म्हणतो.” यावेळी शशांकने त्याची किती रक्कम मिळाली नाही व कोणी दिली नाही याबद्दल काहीही माहिती दिली नाही.

शशांक केतकरच्या वर्कफ्रंडविषयी बोलायच झाले तर, ‘होणार सून मी या घरची’ , ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘इथेच टाका तंबू’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा..’ या मालिकांमध्ये तो झळकला होता. (The producer of the Marathi movie tired Shashank Ketkar of lakhs of rupees)

अधिक वाचा-
‘मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?’, जालना लाठीचार्ज प्रकरणी मराठमोळी अभिनेत्री संतापली
सलमान आणि कतरिनाच्या ‘टायगर 3’चे पहिला पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

हे देखील वाचा