Sunday, December 3, 2023

सलमान आणि कतरिनाच्या ‘टायगर 3’चे पहिला पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

सलमान खानला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. सलमानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफचा अगामी चित्रपट ‘टायगर 3‘ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खान आणि कॅटरिनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमान खान आणि कॅटरिनाच्या ‘टायगर 3‘ चित्रपटाचे पोस्ट लाॅंच करण्यात आले आहे. या पोस्टवरून सोशल मीडियार जोरदार चर्चा रंगली आहे.

सलमान खान ( Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर ‘टायगर 3’ (Tiger 3) आहे. जो दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी ‘टायगर 3’ चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. समोर आलेल्या या पोस्टरमध्ये कॅटरिना आणि सलमान अतिशय दमदार लूकमध्ये दिसत आहेत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबत आणखी उसुक्ता वाढली आहे. आदित्य चोप्राने ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता आगामी ‘टायगर 3’ चित्रपट येणार आहे.

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ नंतर ‘टायगर 3’ हा सलमानचा तिसरा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफशिवाय अभिनेता इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर 3’ दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

भाईजानने पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ” मी येतो, ‘टायगर 3’ या दिवाळी 2023ला प्रदर्शित होईल.” यासोबतच ‘टायगर 3’ हा यशराजच्या मागील स्पाय थ्रिलर ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर 3’ हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (Salman Khan and Katrina Kaif upcoming movie Tiger 3 poster released)

अधिक वाचा-
‘माझ्या मुलीकडे बघताना लोकांची लाळ गळत होती आणि…’, अतिशा नाईक यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
‘मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?’, जालना लाठीचार्ज प्रकरणी मराठमोळी अभिनेत्री संतापली

हे देखील वाचा