Tuesday, May 21, 2024

ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शाेककाळा

प्रसिद्ध अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा मराठी सिनेसृष्टीपासून ते हिंदी सिनेसृष्टीपर्यंत उमटवाला आहे. त्यांच्या जाण्याने बाॅलिवूड सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

आशा नाडकर्णी (Asha Nadkarni) यांचा जन्म सारस्वत कॉलनीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. 1957 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आशा या एक उत्तम नृत्यांगनाही होत्या. 1957 ते 1973 पर्यंत आशा यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. आशा यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (Famous actress Asha Nadkarni passed away on Thursday)

(हि बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा –
ऐंशीच्या दशकात केली होती करियरची दमदार सुरूवात; आता ‘पिंकी बुआ’ बनुन उपासना सिंग करतात प्रेक्षकांना लोटपोट
अदा शर्माने गाणं म्हणत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, अभिनेत्रीचा खास व्हिडिओ एकदा पाहाच

 

 

 

हे देखील वाचा