Thursday, April 25, 2024

माहेरची साडी! ‘सेटवर त्यांचाच दरारा…’म्हणत अलका ताईंनी विक्रम गोखलेंच्या आठवणींना दिला उजाळा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले यांची गेल्या पंधरा दिवसांपासून तब्येत खालावली होती, त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु केले होते. मात्र, (दि, 26, नोव्हेंबर) रोजी अचानकच त्यांची तब्येत बिघडली आणि शेवटी त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी जगाला राम राम ठोकला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकरा सोशल मीडियाद्वारे त्यांनी श्रद्धांजली वाहत आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशीच एक आठवण अभिनेत्री अलका कुबल यांनी एक किस्सा सांगितला आहे.

मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी ‘माहेरची साडी‘ (Maherchi Sadi) या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यांनी या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलका कुबल (Alka kubal) यांच्या वडिलांची भूमिका निभावली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगलीच धमाल केली असून सर्व रेकॉर्ड तोडले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटतो. या चित्रपटाच्या शुटींगची आठवण काढत अलका ताईंनी एक किस्सा सांगितला.

अलका ताईं किस्सा सांगत म्हणाल्या की, “माहेरची साडी हा चित्रपट आम्हालाही तितकाच महत्वाचा आहे. कारण विक्रम यांनी वडीलांची भूमिका साकारली होती आणि मी मुलीच्या भूमिकेत होते. तेव्हापासून जुळलेले नाते विक्रमजींनी कायम आपुलकीने जपले आहे. त्यावेळी आम्ही सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 12 ते रात्री 11 वाजेपर्यत शूट करायचो. त्या टीम मध्ये विक्रमजी, आशालता ताई, उषा नाडकर्णी (Usha Nadkarin) अशी दिग्गज मंडळी होती. तेव्हा देखिल विक्रमजींचा प्रचंड दरारा होता. मात्र, सेटवर ते ज्युनिअर कलाकार आणि तरुन मुलांशी मित्राप्रमानेच वागायचे. प्रत्यक्ष आपुलकीने बोलायचे.”

अलकाजींनी पुढे सांगितले की, “त्यांनी चित्रपटाचा एवढा अनुभव असूनही त्यांनी कधी गर्व केला नाही. ज्येष्ठ-श्रेष्ठत्व असूनही त्यांची सेटवरची वागणूक साध्या व्यक्तीसारखीच असायची. कोणत्याही व्यक्तीला लगेच बोलायचे. त्याशिवाय मधल्या वेळेत आम्ही कॅरम आणि पत्ते खेळायचो. अगदी नाईट आउट डान्स करणे, गाणी म्हणणे यातही विक्रमजी उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यामुळे त्यांचा वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटायचा.”

अभनेत्री अलका कुबल यांनी अगदी मनापासून भावना व्यक्त करत विक्रम गोखले यांच्या आठवनींना उजाळा दिला आहे. आज विक्रमजींनी जगाला राम राम ठेकला असून कला विश्वात शेककळेचे वातावरण पसरले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट
दिलीप कुमार यांच्या 100व्या जयंतीनिमित्त फिल्म फेस्टिवलची घोषणा, अभिनेत्याचे सुपरहिट चित्रपट हाेणार प्रदर्शित

हे देखील वाचा