Tuesday, September 26, 2023

‘…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाही’; प्राजक्ता माळीचे मोठे वक्तव्य

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या प्राजक्ता तिच्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्राजक्ताचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो लगेच व्हायरल होतात. प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या प्राजक्ता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

प्राजक्ताने (Prajakta Mali) ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून तिने प्रत्येक घराघरातील प्रेक्षकांच्या मनात स्वत: ची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. प्राजक्ताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट आहेत. पण प्राजक्ताचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. त्याबद्दल प्राजक्ताने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

प्राजक्ता म्हणाली की, “मी अनेक चित्रपटांंमध्ये काम केले आहे. आत्तापर्यत माझ्याकडे अनेक चित्रपट, मालिका आल्या. माझ्याकडे काम आलं नाही असं कधीही झालं नाही. मी आज पर्यंत जेव्हड्या शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले त्याहून आधीक काम मी नाकारली आहेत. कधी कधी मला काम करत असताना कामाची कमतरता जाणवते. परंतु, मला आजपर्यंत चित्रपटांत मला पाहिजे तस काम मिळाले नाही. त्यामुळे माझा कोणताच चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही.”

प्राजक्ता पुढे बोलताना म्हणाली की, “मी आत्तापर्यंत अनेक मालिका आणि नृत्य यामध्ये खुप मेहनत घेतली आणि वेळे देखील दिला आहे. माझ्या चेहत्यावर सगळं स्पष्ट दिसते. काम मिळतं पण जस काम हवं आहे तस मिळवण्यासाठी मी नेहमा प्रयत्न करत असते. पण एकदा काम हातात आलं का त्यामधील रस कमी होऊन जातो. पुन्हा नव्या कामाची ओढ लागते. त्यामुळे कामात समतोल राखने कठीण होते. पण तो राखता येणं महत्वाचं आहे.” (Famous actress Prajakta Mali said the reason why no film became a super hit)

अधिक वाचा-
शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला इतिहास, कोट्यावधीमध्ये कमाई करणारा ठरला बॉलिवूडमधील पहिला ओपनिंग सिनेमा
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा