Tuesday, June 3, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूड कलाकारांच्या मानधनावर भूषण कुमार यांचे परखड वक्तव्य; म्हणाले, ‘मी आता अशा अभिनेत्यांबरोबर…’

बॉलिवूड कलाकारांच्या मानधनावर भूषण कुमार यांचे परखड वक्तव्य; म्हणाले, ‘मी आता अशा अभिनेत्यांबरोबर…’

कोरोना काळापासून बॉलिवूडचे चित्रपट फार काही चालत नाहीत त्यांमुळे इंडस्ट्रीची परिस्तिथी फार काही चांगली राहिली नाही. दमदार अभिनेत्यांचे चित्रपट देखिल बॉक्सऑफिसवर जोरदार आपटले जात आहेत. मात्र, तरीही बॉलिवूड कलाकार आपल्या मानधानामध्ये काहीच कामतरता करत नाहीत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीली ध्यानात धरुन भूषण कुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) हे अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. बॉलविूड कालाकारांचे मानधन हा हिषय अनेवर्षापासून सुरु आहे. कालकारांचे मानधन हे कोट्यावदीच्या किंमतीत असते. चित्रपटांशिवाय त्यांचा चित्रपटाच्या कमाईत देखिल हिस्सा असतो. सध्या बॉलिवूड मागे पडलं आहे. त्यामुळे निर्मात्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. या विषयावर भूषण कुमार यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्टच मत मांडलं आहे.

भूषण कुमार म्हाणाले की, “बॉलिवूडची परिस्थिती सगळ्या कलाकारांना माहित असूनही ते आपले मानधन कमी करण्यास तयार नसतात. काही अभिनेत्यांना सध्या मार्केटची परिस्थितीची जानीव आहे म्हणून त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काहीजन म्हणाले की, आम्ही इतकेच मानधन घेणार नाही तर आम्ही चित्रपटात काम करणार नाही. मी आता अशा अभिनेत्यांबरोबर काम करणार नाही. मोठ्या चित्रपटांमध्ये अनेकांचे नुकसान झाले असून आपण ते पाहिले आहेत . आम्ही का तुम्हाला पैसे दयायचे 20 ते 25 कोटी तुम्ही घेणार मग आम्ही का नुकसान सहन कारयचे?” अशी स्पष्टच भूमिका त्यांनी मांडली.

भूषण कुमार यांनी आजपर्यत बॉलिवूडमधील अनेक गाजणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय त्यांची स्वत:ची टी सिरिज नावाची कंपनी आहे. दिवंगत गुलशन कुमार (Gulstion Kumar) हे भूषण कुमार यांचे वडील आहेत. ‘तुम बिन‘ या चित्रपटापासून भुषनजी या व्यवसामध्ये उतरले.

2022 हे वर्ष बॉलिवूड कलाकारांसाठी फार काही चांगलं ठरलं नाही सर्वात महागडा चित्रपट लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर जोरदार आदळला. यानंतर अक्षय कुमार याचे लागोपाठ बिग बजेट 4 ते 5 चित्रपट अपयशी ठरले . यानंतर नुकतांच प्रदर्शति झालेला अर्जुन कपूर याचा कुत्ते चित्रपटही बॉक्सऑफिसवर फरा काही कामगरी करु शकला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गोल्डन ग्लोब अवॉर्डनंतर ‘आरआरआर’च्या नावावर अजून एक पुरस्कार, वाचा काय केली कामगिरी
दाक्षिणात्य स्टारर महेश बाबूची लाडकी सिताराचे फोटो पाहिलेत का?

हे देखील वाचा