Saturday, July 27, 2024

काळीज तोडणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याच निधन, चाहते शोकसागरात

मनोरंजन विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते कैलास नाथ यांचे गुरुवारी (3 ऑगस्ट) निधन झाले. अभिनेत्याचे खासगी रुग्णालयात निधन झाले. माध्यमातील वृत्तानुसार, कैलास नाथ हे नॉन-अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिससाठी उपचार घेत होता, हा विकार यकृतावर परिणाम करतो आणि चरबीवर जमा झाल्यामुळे होतो.

2021 मध्ये ‘संथवनम’ या हिट शोच्या चित्रीकरणादरम्यान कैलास नाथ यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आता कैलास नाथ (Kailas Nath) यांच्या निधनाची दु:खद बातमी अभिनेत्री सीमा जी. नायर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यांनी कैलास नाथ यांचा एक फोटो शेअर केला आहे आणि निधनाची माहिती दिली आहे. ही बातमी एकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ते ६५ वर्षांचे होते.

कैलास नाथ यांचा जन्म केरळमधील मुन्नार येथे झाला होता. कैलास नाथ यांना लहानपणा पासूनच अभिनयाची आवड होती. शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी चिरंजीवी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. अनेक दशकांच्या अभिनय कारकिर्दीत, त्यानी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले. 1999 मध्ये ‘संगम’ या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण ‘ओरु थालाई रागम’ या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. (Famous Malayalam actor Kailas Nath passed away)

अधिक वाचा- 
‘कुटुंब वाचवायचे असेल तर भारतातील सर्व मुस्लिमांनी हिंदू झाले पाहिजे’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य
लग्नानंतर लंडनला गेल्यावर किशोर कुमारांना मिळाली होती मधुबालाबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती; मग थेट मामाच्या घरी…

हे देखील वाचा