Thursday, June 13, 2024

‘कुटुंब वाचवायचे असेल तर भारतातील सर्व मुस्लिमांनी हिंदू झाले पाहिजे’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य

बॉलीवूडमध्ये स्वत:ला समीक्षक व अभिनेता म्हणवणारा कमाल रशीद खान आपल्या चित्रपटाच्या रिव्ह्यूपेक्षा वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला ट्रोल देखील केले जाते. पण केआरके त्याच्या कृत्यांपासून कधीच मागे हटत नाही. सध्या केआरके हा स्वतः मुस्लिम असल्याने त्याने ट्विटद्वारे मुस्लिमांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे एका चित्रपट समीक्षक उमेर संधूने वादग्रस्त ट्विट केले आहे.

केआरकेने (kamaal rashid khan) आपल्या ट्विटमध्ये मुस्लिमांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिला आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मी भारतातील सर्व मुस्लिमांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा सल्ला देतो कारण कोणत्याही धर्मापेक्षा तुमचे कुटुंब आणि मुलांचे जीवन महत्त्वाचे आहे. आपण भारतीय मुस्लिमांनी अरबांसाठी धर्मांतर केले आणि आता अरब देश इस्लामचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत. म्हणूनच आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करणे चुकीची गोष्ट नाही”.

तर दुसरीकडे उमेर संधू (Umair Sandhu) म्हणतो की, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत. इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. उमेरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय मुस्लिमांनी बांगलादेश, नेपाळ आणि भूतानमध्ये जावे कारण भारत आता त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. त्यांच्यासाठी तो “नरक” आहे. हिंदूंनी मानवता शिकली पाहिजे.”

सध्या कमाल आर खान आणि उमेर संधूचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहेत. अनेक यूजर्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. केआरकेला थोडी लाज वाटली पाहिजे असे अनेकांनी म्हटले आहे. तसे, कमाल आर खान आणि उमेर संधूने वादग्रस्त ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही या दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर अशी वादग्रस्त विधाने केली आहेत.(actor kamaal r khan says all muslims in india convert hindu because family are more important than religion)

हेही वाचा-
57 वर्षीय शाहरुख खानच्या फिटनेसची आनंद महिंद्रांना पडली भुरळ, म्हणाले, ‘आयुष्य खूप….’
अभिनेते किरण माने ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत दिसणार ‘या’ भूमिकेत; अभिनेत्याने पोस्ट करून दिली माहिती

हे देखील वाचा