मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेले संगीतकार आणि गायक म्हणजे ‘साजन बेंद्रे’. साजन बेंद्रे यांची गाणी प्रदर्शित होताच क्षणीच यू ट्यूबवर व्हायरल होतात. साजन बेंद्रे यांचे नुकतेच “आला बाई शंकरपाळ्या” हे गाणे यू ट्यूबवर रिलीज झाले आहे. अगदी 2 आठवड्यातच या गाण्याला यू ट्यूबवर 4 लाख 64 हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिले आहे. या महिन्यात रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना मागे टाकून हे गाणे यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. साजन बेंद्रे यांची अनेक गाणी या आधी सुपरहिट झाली आहेत. त्यांची ‘आमदार झाल्या सारखं वाटतं’, ‘राडा राडा’ , ‘शालू नाच नाच’, ‘बोल मे हलगी बजावू क्या’ ही गाणी देखील सुपर डूपर हीट झाली होती.
साजन बेंद्रे हे नेहमी एखादा चालू प्रसंग बघून त्यावर गाणी लिहतात आणि स्वतः संगीत देऊन गातात देखील. साजन बेंद्रे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे फक्त सातवी पर्यंत शिक्षण झाले आहे. तरीही आज ते या क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. साजन बेंद्रेंचं सर्वात गाजलेले गाणे, ज्या गाण्यांनी केवळ तरुण वर्गाचेच नव्हे तर अगदी राजकारणातील अनेक नेत्यांचे लक्ष देखील वेधून घेतले होते, ते म्हणजे’ या.. या.. या.. आमच्या बोकांडी बसा.’ विधानसभेच्या वेळी सत्तासंघर्ष चालू होता. त्यावेळी इंदुरीकर महाराजांच्या तोंडून निघालेल्या या शब्दांचे त्यांनी गाणे रचले होते.
साजन बेंद्रे यांचे नुकतेच शंकरपाळ्या हे गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले आहे. खरंतर हा एका गावातला दोन लहान मुलांच्या भांडणाचा किस्सा आहे. ज्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते आणि हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला होता. या व्हिडिओमध्ये दोन 8 ते 9 वर्षांची मुले भांडत असतात. त्यातील एक मुलगा दुसऱ्या मुलाला ‘कारल्या’ अस बोलतो. त्यामुळे दुसऱ्या मुलाला खूपच राग येतो आणि तो पहिल्या मुलाच्या अंगावर धावून येऊन त्याला शंकरपाळ्या अस म्हणतो. त्यावर तो म्हणतो की ,”एका चापतीत खाली पाडेल ना ,दुसरी लागूच देणार नाही.” या मुलाचे हे भांडण कोणीतरी शूट केले, आणि हे भांडण सर्वत्र महाराष्ट्रभर खूपच धुमाकूळ घालत होते. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता. या भांडणातील शंकरपाळ्या नावाचा हॅशटॅग सगळीकडे वापरला जात होता. तसेच या मुलाच्या डायलॉगवर अनेक मीम्स देखील तयार झाले होते.
या भांडणातून शंकरपाळ्या या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून साजन बेंद्रे यांनी हे गाणे तयार केले आहे. जे सध्या यू ट्यूबवर तुफान धमाल करत आहे. ‘ आधी मला जान म्हणायची बबड्या पिल्लू बखळ्या.. आता म्हणती लाडानी आला बाई शंकरपाळ्या.’ हे साजन केंद्रे यांच्या गाण्याचे बोल आहेत. यू ट्यूबवर 4 लाख 64 हजार पेक्षाही जास्त वेळा या गाण्याला बघितले गेले आहे. हे गाणे स्वतः सजान केंद्रे यांनी लिहीले आहे. साजन आणि विशाल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.