Sunday, June 4, 2023

दुख:द! प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिकेचं निधन, किडनीशी संबंधित आजाराने होत्या त्रस्त

सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य पार्श्वगायिका संगीता साजिथ आता या जगात राहिल्या नाहीत. किडनीशी संबंधित आजारामुळे वयाच्या ४६व्या वर्षी त्यांचे निधन झाले. साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये त्यांनी २०० हून अधिक गाणी गायली आहेत. संगीता साजिथ (Sangeeta Sajith) यांनी रविवारी (२२ मे) तिरुअनंतपुरम येथील बहिणीच्या घरी अखेरचा श्वास घेतला. गायिका किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. साऊथ सिनेमातील अनेक गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. तसेच त्यांनी मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

अलीकडेच त्यांनी दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज अभिनित ‘कुरुथी’चे थीम साँग गायले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या त्यांच्या बहिणीच्या घरी राहून किडनीशी संबंधित आजारांवर उपचार घेत होत्या. मात्र, रविवारी सकाळी त्या जीवनाची ही लढाई हरल्या. संगीता यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी थायकॉड, तिरुअनंतपुरम येथील शांतीकावदम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (famous singer sangeeta sajith died at the age of 46)

संगीता यांनी साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये २०० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाबद्दल चाहत्यांसह चित्रपट जगतातील लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. एवढी मोठी गायिका असूनही संगीता यांना साधे राहणे आवडायचे. चाहत्यांनाही त्याची साधी स्टाईल खूप आवडायची.

त्या मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलुगु चित्रपट उद्योगातील एक महत्त्वाचा भाग होत्या. ‘मिस्टर रोमियो’ या तमिळ चित्रपटात त्यांनी गायलेले ‘थन्निराई कथालिकम’ हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. हे गाणे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा