[rank_math_breadcrumb]

फॅनने चुकून रणबीर कपूरला रणवीर सिंग म्हटलं, ‘धुरंधर’च्या यशाच्या शुभेच्छांवर अभिनेत्याचा भन्नाट रिएक्शन

‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिक नितेश तिवारी हे आहेत. तर ही आतुरता संपेल कारण चित्रपटाचे निर्माते उद्या, 2 एप्रिल रोजी, हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘रामा’ नावाने चित्रपटाची पहिली झलक अधिकृतपणे प्रदर्शित करणार आहेत. तर गेल्या आठवड्यात ‘रामायण’ चित्रपटाचा विशेष प्रिव्ह्यू पाहण्याची संधी मिळाली होती. 

या कार्यक्रमाला दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा ​​आणि चित्रपटात भगवान श्रीरामाची भूमिका साकारणारे रणबीर कपूर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला, जेव्हा एका चाहत्याने आदित्य धरच्या ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल अभिनंदन करत रणबीरला चिडवले. विशाल मिश्रा नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने रणबीरसोबतचा एक सेल्फी शेअर केला आणि सांगितले की, त्याने रणबीरला सांगितले की त्याला ‘धुरंधर’मधील त्याचे काम खूप आवडले.

यामुळे रणबीर (ranbeer)थोडा चकित झाला आणि त्याने स्पष्ट केले, “नाही, तो दुसरा रणवीर आहे, मी रणबीर आहे त्याचे वाक्य पूर्ण करण्याआधीच, नितेश तिवारी यांनी त्याला मध्येच थांबवत स्पष्ट केले की, तो चाहता केवळ त्याच्या जुन्या ‘ड्रीम 11’ जाहिरातीचा संदर्भ देऊन त्याला चिडवत होता. वर्षभरापूर्वी प्रसारित झालेल्या या प्रसिद्ध जाहिरातीत, आमिर खान रणबीर कपूरला वारंवार ‘रणवीर सिंग’ म्हणून चिडवतो. हा गैरसमज लक्षात येताच रणबीर खळखळून हसला. नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल, ज्याचा पहिला भाग या दिवाळी 2026 ला आणि दुसरा भाग दिवाळी 2027 ला प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रामायण’च्या रिलीजपूर्वी रणबीरला चाहत्याकडून मिळाली खास भेट, भेट वस्तुवर प्रभू रामांची आहे झलक