दिव्यांका त्रिपाठी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यत अनेक मालीका केल्या आणि ती प्रत्येक घराघरात पोहचली. ती तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. तर आता काही महिन्यापुर्वी ति आई होणार असल्याचे तिने सांगितले होते आणि तिला आता जुळे बाळ झाले आहे. तर आता दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी शुक्रवार, 29 मे 2026 रोजी त्यांच्या जुळ्या मुलांसोबत पहिली सार्वजनिक हजेरी लावली. तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तर याच दरम्यान दिव्यांका आणि विवेक यांनी आपल्या दोन मुलांसोबत पहिल्यांदाच पापाराझींसाठी पोज दिली आणि त्यांचे चेहरे उघड न करण्याची विनंती केली.
दिव्यांका त्रिपाठी (triparty)आणि विवेक दहिया यांना 10 वर्षेीनी मुल प्राप्त झाले आहे. आणि ते दोघे आता खुप आंनदात आहेत. त्यांनी यावर्षी मार्चमध्ये त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यांच्या जुळ्या मुलांच्या जन्माने त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना आनंद झाला आहे. दिव्यांका आणि विवेक रुग्णालयातून बाहेर येताच, त्यांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीय जमले. तर त्यांनी पापाराझींशी संवादही साधला.
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया याच्या या भावनिक क्षणात थोडा विनोद आणत विवेक म्हणाला, “अरे, रुग्णालयात एक ऑफर चालू आहे: एक वर एक फ्री.” त्याच्या विनोदी टिप्पणीने आजूबाजूचे सर्वजण हसले.दिव्यांका आणि विवेक यांची पहिली भेट ‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. आणि त्यांनतर त्याच्यात मैत्री झाली आणि तिचे प्रेमात रूपांतर झाले आणि 8 जुलै रोजी2016 त्यांनी लग्न केले.










