Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड समंथा आणि नागा चैतन्य यांचा जुना फोटो चर्चेत; नेटकरी देताहेत तीव्र प्रतिक्रिया…

समंथा आणि नागा चैतन्य यांचा जुना फोटो चर्चेत; नेटकरी देताहेत तीव्र प्रतिक्रिया…

काही दिवसांपूर्वी अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिच्याशी साखरपुडा केला. मात्र तेव्हापासून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचे चाहते या जोडप्याला ट्रोल करताना दिसले. नागा चैतन्य याने सोशल मिडीयावरून त्याचे आणि समंथाचे सगळे फोटो तसे काढून टाकले आहेत. पण एक फोटो मात्र अजूनही तिथेच आहे. 

हा फोटो २०१८ सालचा आहे. यात चैतन्य आणि समंथा रेड कार रेस मध्ये एकत्र पोझ देताना दिसत आहेत. या फोटोवर सर्वांच्या तीव्र कमेंट्स येत आहेत. तर या फोटोच्या कॅप्शनमुळे ट्रोलर्सचा राग आणखी वाढला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘मिसेस अँड द गर्लफ्रेंड’ असे लिहिले आहे. चैतन्यने शोभितासोबत एंगेजमेंट केल्यानंतर नेटिझन्स हा फोटो डिलीट करण्याची मागणी करत आहेत. 

पोस्टवर कमेंट करताना, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘कॅप्शन वगळता हे चित्र तुमच्या फीडमध्ये असण्यात काहीही गैर नाही. नागा आता सामंथा तुझी मिसेस नाही आणि तू शोभितासोबत नवीन प्रवास सुरू करत आहेस म्हणून मुद्दाम दुर्लक्ष करणं योग्य नाही. आम्ही तुमच्या भूतकाळाचा आणि वर्तमानाचा खरोखर आदर करतो, तुमच्या नवीन प्रेम जीवनाबद्दल अभिनंदन.

काही वापरकर्त्यांनी नागा चैतन्यला त्याचे पालक, नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती यांच्या विभक्त झाल्याची आठवणही करून दिली. नागा चैतन्यने ८ ऑगस्ट रोजी शोभिता धुलिपालासोबत एंगेजमेंट केली होती. चार वर्षांच्या लग्नानंतर चैतन्यने २०२१ मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

‘आदिपुरुष’च्या फ्लॉपवर क्रिती सेननने मांडले मत; म्हणाली, ‘आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा