Saturday, June 29, 2024

अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सुपरस्टार अजय देवगणच्या आगामी भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नोरा फतेहीची स्टाईल आणि अंदाज प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आग लावण्यासाठी पुरेसा आहे. हिना रेहमानची भूमिका साकारणारी नोरा या चित्रपटातही जोरदार डान्स करताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ‘जालिमा कोका कोला’ या गाण्याचा डान्स व्हिडिओ रिलीझ झाला आहे. या गाण्यातील नोराच्या डान्सने प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेड लावलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

हे नवीन ‘झालिमा कोका कोला’ गाणं इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हे गाणं ट्विटरपासून ते फेसबुकपर्यंत सर्वत्र ट्रेंड करत आहे. यूट्यूबवरही या गाण्याला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आणि ही संख्या सतत वाढत देखील आहे.

एकीकडे काही प्रेक्षकांना हे गाणं प्रचंड आवडलं आहे, तर दुसरीकडे काही प्रेक्षकांना श्रेया घोषालच्या आवाजात हे गाणं अजिबात आवडलं नाहीये. प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, हे पार्टी सॉंग श्रेया घोषालच्या आवाजात असल्यामुळे त्यांना पसंत पडलं नाही. श्रेया घोषालने अशा प्रकारचं पार्टा सॉंग गायल्यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

ट्वीटरवर ट्वीट करून श्रेया घोषालचे चाहते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं की, “मला वाटलं नव्हतं की श्रेया घोशाल मॅम जालिमा कोका कोला सारखं गाणं गातील.” दुसरा युजर म्हणतोय की, “मला समजत नाहीये की श्रेया घोशालचं जालिमा कोका कोला गाणं सगळ्यात वाईट आहे, का शाहरुख खानची पान मसाला ऍड. ” तर एक चाहत्याने ट्वीट केलं की, “मी आताच श्रेया घोशालचं गाणं ऐकलं आणि मला आता खूप चिडचिड होत आहे.” (fans trolling shreya ghoshal for her latest zalima coca cola song)

https://twitter.com/PushpaMehra2021/status/1420971004638109701?s=20

हे ट्वीट पाहून चाहत्यांची झालेली निराशा सहज तुमच्या लक्षात येईल.

या गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर श्रेया घोषालच्या आवाजात असलेलं हे गाणं वायुने लिहिलं आहे. याचं संगीत तनिष्क बागचीने तयार केलं आहे आणि गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा