Sunday, June 23, 2024

अर्रर्र, हे काय झालं! अभिनेत्री क्रिती सेननच्या चेहऱ्यावर दिसली सूज, व्हिडिओ जोरदार व्हायरल

अनेकदा बॉलिवूड स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. मग ते कारण चित्रपट असो वा लूक. असेच काहीसे क्रिती सेननसोबत घडले आहे. क्रितीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. लोकांना तिचा सुजलेला चेहरा आणि मोठ्या भुवया आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

क्रितीने (Kriti Sanon) 27 जुलैला तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रितीने ब्युटी प्रोडक्ट लाँच केले आणि चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभारही मानले. पण या पोस्टमध्ये एक खास गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. क्रितीचा चेहरा किंचित सुजलेला दिसत आहे आणि एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या ओठांचा आकारही उंचावलेला दिसत आहे. त्याचबरोबर मोठ्या भुवयांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

क्रितीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत असताना एकाने लिहिले की, “क्रितीनेही बोटॉक्स करून घेतले आहे”. दुसऱ्याने लिहिले की, “तुझ्या चेहऱ्यावर काही झालंय का?” तर तिसऱ्या एकने लिहिले की, “अगं क्रिती, तू काय केलेस, पूर्वी तु खूप गोंडस दिसायची, आता तू बेकार दिसत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीने याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. पण अभिनेत्रीची तब्येत ठीक नाही. अशा स्थितीत तिच्या खालावलेल्या तब्येतीचा हा दुष्परिणाम असू शकतो. जो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. क्रितीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायच झाले तर, ती लवकरच टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. (Fans were shocked to see swelling on Kriti Sanon face)

अधिक वाचा- 
नशिबाची थट्टा! फरदीन खान वयाच्या 49व्या वर्षी घेणार घटस्फोट; मोडणार 18 वर्षांचा संसार?
“तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन?” बापूंवरील ‘ती’ कविता शेअर करत अतुल कुलकर्णीचे भिडे गुरुजींना उत्तर

हे देखील वाचा