आतापर्यत बाॅलिवूडमधील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले आहे. पण काही कलाकारांचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. काही दिवसांपुर्वी अरबाज खान – मलायका अरोरा, हृतिक रोशन – सुझान खान, सोहेल खान – सीमा सजदेह यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आणखी एका सेलिब्रिटीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आणि प्रसिद्ध अभिनेता फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. गेल्या 18 वर्षांपासून एकत्र असलेल्या कपलने विभक्त व्हायचा निर्णय घेतल्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे.
2015 मध्ये फरदीन (Fardeen Khan) आणि नताशाने थाटामाटात लग्न केल होत. माध्यमातील वृत्तानुसार, आता त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक चालत नाहीये. दोघांमधील अंतर इतके वाढले आहे की, दोघेही एक वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. फरदीन मुंबईत राहतो, तर नताशा तिच्या आईसोबत लंडनमध्ये राहते. आता या जोडप्याने एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद होत आहे किंवा दे दोघे खरच विभक्त होणार आहेत का? याचे खरे कारण अद्यापही समोर आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी यांच्या घटस्पोटाच्या बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत.
नताशा 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजची मुलगी आहे. ज्यांनी राजेश खन्ना पासून ते धर्मेंद्र पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. दोघांनीही भव्य पद्धतीने लग्न केले होते. तसेच दोघांना दोन मुले आहेत. याबाबत फरदीनशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्याने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. फरदीन दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचे पूत्र आहेत. फरदीन लवकरच ‘विस्फोट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. (Actor Fardeen Khan and wife Natasha Madhwani’s divorce has been discussed)
अधिक वाचा-
–“तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन?” बापूंवरील ‘ती’ कविता शेअर करत अतुल कुलकर्णीचे भिडे गुरुजींना उत्तर
–“त्या टाळ्या कधी संपुच नयेत” खास पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने पत्नी क्षितीवर ‘त्या’ भूमिकेसाठी उधळली स्तुतीसुमने