Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड अरर, गंडलं राव! 100 रुपयांच्या तिकिटाची जादू फसली; तीन दिवसात 10 कोटी छापू शकला नाही ‘ब्रह्मास्त्र’

अरर, गंडलं राव! 100 रुपयांच्या तिकिटाची जादू फसली; तीन दिवसात 10 कोटी छापू शकला नाही ‘ब्रह्मास्त्र’

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने वेगळ्या भाषेतही चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 झाले असूनही हा चित्रपट एक कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे.

बॉलिवूडमध्ये अचानकच बॉयकॉट ट्रेंड सुरू झाल्याने अनेक चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला. यामध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले. त्यामुळे बॉलिवूडची दुर्दशा झाली होती. त्यासोबतच सोशल मीडियावर साऊथ आणि बॉलिवूडचा वादही चांगलाच पेटला होता. एवढं सगळं सुरू असताना ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने धमाल केली आणि बॉलिवूडची डूबती नैय्या सांभाळली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 20 दिवस लोटले आहेत, पण तरीही हा चित्रपट एक कोटीपेक्षाही जास्त कलेक्शन करत आहे. तसं पाहायचं झालं, तर या चित्रपटाचे बजेट 410 कोटींचे होते. भारतामध्ये या चित्रपटाने चांगली क्रेज तर मिळवलीच पण बॉक्स ऑफिसवर 261.1 कोटींचाच गल्ला जमवू शकला. मात्र, हा चित्रपट भारतातच नाही, तर अनेक देशांमध्येही प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाने आपला बजेटचा आकडा पार केला आहे. म्हणजेच वल्डवाईड कमाईबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अनेक ठिकाणी हवी तशी कमाई केली. मात्र, भारतामध्ये चित्रपट निर्मात्यांनी जशी अपेक्षा होती, तशी कमाई झाली नाही. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट दिनी या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत कमी केली. मात्र, त्याचा कमाईवर चांगला परिणाम झाला आणि ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ने 10.79 एवढी कमाई केली. या दिवशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून निर्मात्यांनी नवरात्रीच्या चार दिवसानंतरही म्हणजेच 26 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यत तिकिटांची किंमत 100 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- आहा कडकच ना! नोरा फतेहीचा मराठमोळा लूक वेधतोय सर्वांचं लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

तिकिटाची किंमत कमी करूनही याचा चित्रपटाच्या कमाईवर फार काही फरक पडताना दिसत नाहीये. कारण, आंतरराष्ट्रीय चित्रपट दिनी चित्रपटाने 10.79 कोटींचा आकडा पार केली होती. त्यामुळे चित्रपट निर्मात्यानुसार, नवरात्रीच्या 4 दिवसात चित्रपटाला 10 कोटींचा आकडाही पार करताना दिसत नाहीये. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाची कमाई ठीक ठाक पद्धतीने होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भोजपुरीतील सर्वात रोमँटिक गाणं होतंय व्हायरल, यामिनी सिंगच्या अदांवर फिदा झाला अरविंद अकेला कल्लू
‘धकधक गर्ल’ माधुरीसोबत ‘नॅशनल क्रश’ने धरला ठेका, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

हे देखील वाचा