Tuesday, July 23, 2024

शाहिद कपूरने एका छोट्या गोष्टीसाठी केले सर्वांना परेशान, ओरडून सांगितली फक्त एकच गोष्ट

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘जर्सी’मुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. पण या काळात तो मस्ती करायलाही विसरत नाही. अलीकडेच अभिनेत्याने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ओरडत आहे आणि आसपासच्या लोकांना त्रास देत आहे. शाहिदचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर असून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे.

शाहिदने व्हिडिओ केला आहे शेअर
शाहिद कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद कॉफीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास देताना दिसत आहे. तो ओरडत आहे आणि त्याच्या सहकाऱ्यांना कॉफी प्यायला सांगत आहेत. शाहिदची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. या व्हिडिओमध्ये शाहिदही खूपच मस्त दिसत आहे.

जर्सी’ १४ एप्रिलला होणार आहे प्रदर्शित
शाहिद कपूरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे. शाहिदचा हा मोनोक्रोम लूक चाहत्यांना खूप आवडणार आहे. शाहीद कपूर लवकरच ‘जर्सी’मध्ये दिसणार आहे. हा क्रिकेटच्या खेळावर आधारित एक धमाकेदार चित्रपट असून, या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट यापूर्वी २५ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोव्हिड नियमांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

शाहिद करणार आहे डिजिटल पदार्पण
शाहिद कपूरच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाले, तर अभिनेत्याने नुकताच ‘वळू’ चित्रपट साइन केला आहे. शाहिद कपूर लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे. तो चित्रपट निर्माता राज आणि कृष्णा यांच्या आगामी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याआधी या दोन्ही चित्रपट निर्मात्यांचा ‘द फॅमिली मॅन’ प्रदर्शित झाला असून, त्यातील दोन्ही सीझन खूप गाजले होते. चित्रपटांव्यतिरिक्त शाहिद वेबसीरिजमध्येही आपली ताकद कधी दाखवणार याची चाहत्यांना प्रतीक्षा असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा