अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर आणि रेखा अभिनित भूत चित्रपट आहे. जो 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनात कथा आणि अभिनयाने घर निर्माण केले होते. बॉलीवूडमधील प्रचंड गाजलेला हॉरर मूवी पैकी एक होता. आणि हा चित्रपट 2026 च्या रेड लोरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित झाला.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, वर्मा यांनी चाहत्यांशी संवाद साधला.
राम (ram)गोपाल वर्मा चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाले, “मी हा चित्रपट फक्त 30 दिवसांत पूर्ण केला कारण मी त्याचे जास्त चित्रीकरण एकाच अपार्टमेंटमध्ये केले होते. मी तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो. हा चित्रपट 2002 मध्ये चित्रित झाला होता. 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे तर तो आजही फ्लॅट रिकामा आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
राम गोपाल वर्मा यांनी खुलासा केला की ते लहानपणा पासुनच “द एक्सॉर्सिस्ट” चे चाहते आहेत. या चित्रपटाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. 2003 मध्ये आलेल्या त्यांच्या “भूत” चित्रपटाबद्दल बोलताना, राम गोपाल वर्मा म्हणाले, “मी जेव्हा भूत बनवत होतो, तेव्हा सुरुवातीला तो एका हवेलीत सेट करण्याची कल्पना होती, परंतु त्यावेळी ती सर्वात क्लिच कल्पना वाटली. एका जाहिरातीत म्हटले आहे की हवेलीची कल्पना आता जुनी झाली आहे. हॉरर चित्रपटांसाठी सर्वात सामान्य आहे. आपण ते गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर का सेट करू नये? मी विचार केला, एका विशिष्ट ठिकाणी का जायचे? मला वाटतं की ते जितकं परिचित वाटतं तितकं ते वास्तव वाटतं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मुथु एंगिरा काट्टान’ मध्ये उलगडणार मोठं रहस्य, विजय सेतुपतीची नवी मिस्ट्री सिरीज चर्चेत


