सध्या देशभरात एक शो चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी 2‘ होय. अलीकडेच वीकेंडच्या वॉरमध्ये शोचा होस्ट आणि सुपरस्टार सलमान खान स्पर्धक एल्विश यादव याच्यावर संताप व्यक्त करताना दिसला. यामुळे सोशल मीडियावर चोहोबाजूंनी सलमानला ट्रोल केले जात आहे. त्याच्या फॉलोव्हर्समध्येही कमालीची घसरण झाली आहे. तसेच, आता एल्विशला पाठिंबा दर्शवत गँगस्टर गोल्डी ब्रारने सलमान खानला जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
झाले असे की, सलमान खान (Salman Khan) वीकेंडच्या वॉरमध्ये एल्विश यादव (Elvish Yadav) याच्यावर संतापला होता. यामागील कारण एल्विशचे बेबिका धुर्वे आणि जिया शंकर (Jiya Shankar) यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करणे होते. त्यामुळे सलमानने एल्विशची त्याच्या आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणे करून दिले होते. यादरम्यान एल्विश रडताना दिसला होता.
सलमानचे फॉलोव्हर्स झाले कमी
एल्विश याच्यासोबत सलमान ज्याप्रकारे वागला, ते अनेक चाहत्यांना आवडले नाही. अशात चाहत्यांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सलमान खान इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर चांगला सक्रिय असतो. तिथे त्याचे 66.8 मिलियन फॉलोव्हर्स होते. मात्र, एल्विशसोबतच्या घटनेनंतर त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या 63.7 मिलियन झाली आहे. यानंतर एका युजरने कमेंट करत म्हटले की, “हे पाहून सलमानची सिस्टम हादरली असेल.” आणखी एकाने लिहिले की, “फॅन आर्मीची पॉवर पाहिला का?” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुम्हाला वाटते का भाईजानला याने काही फरक पडेल?”
View this post on Instagram
एल्विशला पाठिंबा देत सलमानला धमकी?
याव्यतिरिक्त गँगस्टर ग्लोडी ब्रार (Goldy Brar) याचे एक ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने एल्विशला पाठिंबा देत सलमानला धमकावताना दिसत आहे. ट्वीट करत त्याने लिहिले की, “बिग बॉसमध्ये एल्विश यादवला जी वाईट वागणूक दिली आहे, त्याचा बदला घेण्याची जबाबदारी मी घेतो. एल्विश भाऊ तू सिस्टमवर सिस्टम करत राहा. सिस्टमम हँग ठेव भाई सलमानची, त्याला तर मीच मारणार.”
#ElvishArmy #ElvishYadav???? #ElvishYadavArmy #lawrenceBishnoi bhai aur #goldybrar bhai
Kuch vaada kiya tha aapne#ElvishArmy???? Bhaiyo like and retweet karo ye post pic.twitter.com/vNoZzkyICy— fakerajput111119971 (@rajput111119971) July 30, 2023
मात्र, या ट्वीटमध्ये किती सत्यता आहे, याची पुष्टी अद्याप झाली नाहीये.
पोलिसांनी वाढवली सलमानची सुरक्षा
खरं तर, गोल्डी ब्रार याच्या ट्वीटची सत्यता समोर आली नाहीये, पण परिस्थिती पाहता, मुंबई पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली आहे. खरं तर, अलीकडच्या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारी आशिका भाटिया शोमधून बाहेर पडली. अभिनेत्रीने ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) शोमध्ये खूपच कमी वेळ घालवला, पण यादरम्यान तिची मनीषा राणी, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांची चांगली मैत्री झाली होती. बिग बॉसच्या घरातून तिला जाताना पाहून इतर स्पर्धकही भावूक झाले होते. (followers dropped in millions and goldy brar death threat to salman khan after scolding elvish yadav in bigg boss ott 2)
हेही वाचा-
‘या’ बॉलिवूड जोडप्याला देशाबाहेर कुणीही ओळखत नाही! स्वत:च स्वत:चे सामान उचलून निघाले कलाकार, Video
वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’