हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री अमिषा पटेलवर (Amisha Patel) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने, सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमासाठी तासाचे ४ लाख रुपये घेऊन फक्त तीन मिनीटचे सादरीकरण केल्याने, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्यावर थेट फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र यावर अमिषाने मात्र या कार्यक्रमात माझ्या जीवाला धोका होता, असे म्हणत कार्यक्रमाच्या आयोजकांवरच धक्कादायक आरोप केले आहेत, त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे.
२३ एप्रिल रोजी खंडव्यातील नवचंडी देवी धाम जत्रेची सांगता झाली. यावेळी स्टार नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अमिषा पटेलने भाग घेतला होता. यासाठी तिने एका तासाचे ४ लाख रुपये इतके पैसे घेतले होते. मात्र अमिषा पटेलने स्टेजवर अवघ्या ३ मिनिटांसाठी परफॉर्म केले आणि ती परतली. यानंतर खंडव्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात खंडव्यातील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पण आता या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे, अमिषा पटेलने २४ तारखेला सकाळी ट्विटरवर ट्वीट करून खांडव्याच्या नवचंडी उत्सवात आल्याची माहिती दिली होती. अमिषाने आयोजकांवर राग काढत “हा अतिशय खराब कार्यक्रम होता. माझा जीव धोक्यात होता. माझी काळजी घेणाऱ्या स्थानिक पोलिसांचे मी आभार मानते.” असा धक्कादायक आरोप केला आहे. समाजसेवक सुनील जैन यांनी यावर बोलताना, “बॉलिवूड आणि राजकारणातील मोठे लोक खांडव्यात येत असतात. सर्वांचा आदर केला जातो. त्याचे चाहतेही त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात. अशा स्थितीत सुरक्षेचा धोका कोणालाच नव्हता. अभिनेत्रीने केलेले आरोप खोटे आहेत,” असे स्पष्टिकरण दिले आहे.
दुसरीकडे, खांडवाच्या मोघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी ईश्वर सिंग चौहान यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला खूप गर्दी होती. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना संरक्षण देऊन वाहनापर्यंत आणले होते. मुंबई ते खांडवा दरम्यान कोणतीही घटना घडली की नाही, हे आम्हाला माहीत नाही. अमिषा पटेल यांच्याकडून अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-