‘बापरे..स्वामी..स्वामी!’ कोरोनाची लस घेताना अंकिता लोखंडेची भीती झाली कॅमेऱ्यात कैद; मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल

frightened ankita lokhande chants swami samarath name while taking corona vaccine


अभिनेत्री अंकिता लोखंडे ही अशा कलाकारांपैकी एक आहे, जे आपल्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहतात. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांना स्वतः विषयी अपडेट देत राहते. छोटी- मोठी प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या १८ वर्षांच्या वरील सर्वांसाठी कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. अभिनय क्षेत्रातील बरेच कलाकार लस घेताना दिसले आहेत. अंकितानेही लसीचा पहिला डोस घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत तिने सर्वांना लस लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहनही केले आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मजेची बाब म्हणजे, लस घेताना अंकिता खूप घाबरलेली पाहायला मिळाली. अंकिताची भीती पाहून, नर्सही तिला सूचना देताना दिसली. मात्र, तरीही तिची भीती जात नव्हती. त्यावेळी अभिनेत्रीने स्वामी समर्थांच्या नावाचा जप सुरू केला. स्वामी… स्वामी असे बोलता बोलताच तिला लस टोचविली गेली आणि तेव्हा कुठे अंकिताने सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर ती हसायला लागली.

लस घेताना अंकिताची आईदेखील तिच्या सोबत राहून, तिला धीर देत होती. मात्र अभिनेत्रीची घाबरलेली अवस्था या मजेदार व्हिडिओमध्ये कैद झालेली पाहायला मिळाली. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही बऱ्याच मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अंकिताने झी टीव्हीवरील ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेत ‘अर्चना’ची भूमिका साकारून बरीच प्रसिद्धी मिळवली. २०१९ मध्ये अंकिताने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटातून केली. त्यानंतर ती २०२० मध्ये आलेल्या ‘बागी ३’ मध्ये दिसली होती, ज्याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण? घ्या जाणून

-‘राधे…’ चित्रपटातील टायटल ट्रॅकचा मेकिंग व्हिडिओ व्हायरल, असे काय झाले की, दिशा पटानीला सलमान खानला म्हणावे लागले सॉरी


Leave A Reply

Your email address will not be published.