Saturday, September 30, 2023

जमलं रे जमलं! मराठी सिनेसष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अडकणार विवाह बंधनात; पाहा फोटो

सिनेमातील क, ख ही ज्याला माहित नव्हतं असा भाऊराव कऱ्हाडे आज चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने आपल्या पहिल्याच सिनेमात जीव ओतला आणि भाऊचं नाव देशभरात गाजलं आहे. आज दिग्दर्शक नागराज मंजुळेच्याही पुढे जाण्याची ताकद भाऊमध्ये आहे, असे म्हटलं जाते. त्यामुळे भाऊ नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. पण आज तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. भाऊरावच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ते लवकरच विवाह बंधनात अडतणार आहे.

भाऊरावने (Bhaurao Karhade ) सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांने पोस्ट करताना लिहिले की, “आता लवकरच खरा सिनेमा सुरू…. तुम्ही सगळ्यांनी आशिर्वाद द्यायला नक्की यायचंय…” हा पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकजण त्यांचे ‘अभिनंदन’ करत आहेत. तर एका युजरने कमेंट करताना लिहिले की, “अभिनंदन सर, हा पण हिट असनारआहे.” तर आनखी एकाने लिहिले की, “नक्की येऊ .” त्यांनी दोघांचा ही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाची कपडे घातली आहेत.

भाऊराव कऱ्हाडे याच्या विषयी बोलायचं झाले तर, भाऊराव हा सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगाआहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरूर गव्हाणवाडी या छोट्याशा खेड्यातला त्याचा जन्म झाला आहे.. भाऊरावला लहानपणापासूनच शिक्षणाची फारशी गोडी नव्हती, पण त्याला वाचायला खूप आवडत असे. हातात येईल ते पुस्तक तो वाचत बसायचा. गुरं-ढोरं चरायला नेतानाही भाऊरावच्या हातात नेहमी पुस्तक असायचचे.

पुस्तक वाचण्याबरोबरच भाऊरावचा दुसरा खुप आवडता छंद म्हणजे चित्रपट पाहणे. भाऊच्या आयुष्यात त्यानं बघितलेला पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ हा आहे. त्याला चित्रपटाचा नायक होण्यापेक्षा दिग्दर्शक होण्याच स्वप्न त्यांनी मनाशी बाळगल आणि ते पूर्ण देखील केले आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ आणि आता टीडीएम या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. (Famous Marathi cinema director Bhaurao Karhade will be tied up in marriage)

अधिक वाचा- 
जयश्री गडकरांनी वयाच्या 13व्या वर्षीच केले अभिनयात पदार्पण; तर सर्वांपासून लपूनछपून नेहमी करायच्या ‘हे’ काम
“तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर…”, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीला गंभीर दुखापत

हे देखील वाचा