Friday, March 29, 2024

अभिनयासोबतच बिझनेस मध्ये अटकेपार झेंडे रोवणाऱ्य ‘या’ नायिकांचे व्यवसाय तुम्हाला माहिती आहेत का?

बॉलीवूडमध्ये अभिनेत्यांइतकेच किंवा त्यांच्याहून थोडे जास्त महत्व अभिनेत्रींना आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्री ह्या चित्रपटात अभिनय करतातच पण काही अभिनेत्री ह्या चित्रपटांव्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळे काम करतात. त्यातूनही त्या चांगले पैसे मिळतात. अनेक अभिनेत्रीचे साइड उद्योग आहे त्यात काही अभिनेत्रींचे स्वतःच यूट्यूब चॅनेल आहे. ज्यातून त्या रेसिपी, फिटनेस, फँशन आदींबद्दल माहिती देतात. काही अभिनेत्री ह्या चांगल्या लेखिका आहेत. त्या विविध ठिकाणी लेख लिहून पुस्तकं लिहून पैसे कमावतात.

आज आपण या लेखातून अशाच काही अभिनेत्री आणि त्यांचे साइड बिझनेस याबद्दल जाणून घेणार आहोत.

दीपिका पदुकोण:

हिंदी सिनेमातील आजच्या घडीची सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दीपिका ओळखली जाते. चित्रपटांच्या मध्यमातून दीपिका करोडो रुपयांची कमाई करत असते. दीपिकाची ड्रेससिंग स्टाईल अनेक लोकांना आवडते, बऱ्याच मुली दीपिकाचे कपडे कॉपी करत असतात. यालाच अनुसरून दीपिकाने काही वर्षांपूर्वी ‘ऑल अबाउट यू’ नावाचा फॅशन ब्रँड बाजारात आणला. तिच्या ब्रँडचे कपडे ‘मिंत्रा’ या साइटवर उपलब्ध आई.

अनुष्का शर्मा:

लवकरच आई होणाऱ्या अनुष्काने देखील चित्रपटांशिवाय दुसरे काही उद्योग सुरु केले आहे. अनुष्काने तिच्या भावासोबत ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाची फिल्म प्रोडक्शन आणि ड्रिस्टिब्यूशन कंपनी सुरु केली आहे. याअंतर्गतच अनुष्काने ‘एन एच 10’, ‘फिल्लोरी’ आणि ‘परी’ चित्रपटाची निर्मिती केली होती. तिने ‘पाताललोक’ या वेबसिरीजची निर्मिती देखील केली होती. यासोबतच अनुष्काचा ‘nush’ नावाचा एक क्लोथिंग ब्रँड देखील आहे.

सनी लियोनी:

सनीने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे. सनी एक अडल्ट स्टार होती, त्यामुळेच तिने साइड बिझनेस सुद्धा अडल्ट संबंधितच सुरु केला आहे. तिने अडल्ट स्टोर चालू केले आहे ज्यात एडल्ट टॉयज, एट्रैक्टिव कॉस्ट्यूम, पार्टी वियर, स्विम वियर आदी गोष्टी मिळतात. यासोबतच तिने ‘लस्ट’ नावाने एक परफ्यूम आणि कॉस्मेटिकब्रँड देखील सुरु केला आहे,

सुश्मिता सेन:

विश्वसुंदरी असलेली सुश्मिता चित्रपटांसोबतच बिझनेस मध्ये देखील यशस्वी आहे. तिने स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड बाजारात आणला असून तो खूप लोकप्रिय आहे. शिव्यातीची तंत्रा एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन कंपनी सुद्धा आहे.

कतरीना कैफ:

बॉलीवूडची बार्बी डॉल कतरीना उत्तम अभिनयसोबतच डान्सही चांगला करते. कतरीना दिसायला देखील खूप सुंदर आहे. तिने ब्युटी ब्रँड ‘नायका’ सोबत पार्टनरशिप केली असून ‘kay ब्युटी’ नावाचा स्वतःचा ब्रँड लाँच केला आहे.

हे देखील वाचा