प्रेम आंधळ असतं हेच खर! ‘या’ अभिनेत्री कधी दाऊदसोबत तर कधी स्मगलरसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे आल्या चर्चेत

0
62
monika bedi jackline fernandiz mamta kulkarni
Photo Courtesy: Instagram/ monabedi/ jacquelinef143

सध्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqueline fernandez) ठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चर्चेत आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात बुधवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जॅकलिनची चौकशी केली आणि काल पुन्हा एकदा समन्स बजावले. दरम्यान, अशीही बातमी आली होती की, जॅकलिन फर्नांडिसला कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनचा सुकेशवर इतका प्रभाव होता की ती त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पाहत होती. यामुळे जॅकलिनचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तसे, ही पहिलीच घटना नाही, जेव्हा एखाद्या अभिनेत्रीने आपले हृदय एखाद्या वादग्रस्त व्यक्तीला दिले असेल. याआधीही अनेक अभिनेत्री चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आहेत. जाणून घेऊया…

मोनिका बेदी (monika bedi) – बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मोनिका बेदीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी बरेच दिवस जोडले गेले होते. दोघांच्या लव्हस्टोरीने त्यावेळी बरीच चर्चा केली होती. अबू सालेमचे प्रेम मोनिका बेदीच्या डोक्यात इतके होते की तिने आपले करिअर बाजूला ठेवले आणि तुरुंगाची हवाही खाल्ली.

मंदाकिनी (Mandakini) – ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात आपल्या बोल्ड सीन्सने चर्चेत आलेली अभिनेत्री मंदाकिनी हिच्यावर अंडरवर्ल्ड किंग दाऊद इब्राहिमनही फिदा झाला होता. दोघांना एकदा मॅच पाहताना एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, अभिनेत्रीने प्रत्येक वेळी दाऊदसोबत संबंध असल्याचा इन्कार केला आहे.

ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni) – नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी एका ड्रग्ज स्मगलरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध ड्रग स्मगलर विकी गोस्वामीसोबतच्या चुकीच्या नात्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णीचे करिअर उद्ध्वस्त झाले होते. ममतानेही विकीशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, एकदा पोलिसांनी त्याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. दरम्यान सध्या गाजत असलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त जॅकलीनचेच नव्हेतर नोरा फतेही, निकी तांबोळी आणि चाहत खान यांचींही नावे समोर आली आहेत. या अभिनेत्रींनाही सुकेशने महागडी गिफ्ट्स दिल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका करणारा ‘केजीएफ’ सुपरस्टार यश, ‘ब्रम्हास्त्र’ च्या डबल बजेट असलेल्या चित्रपटाची घोषणा
नेहा कक्करच्या बोल्ड लूकवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘बाई तुझा डिझायनर …’
युजरने ‘बबिता’ला विचारली, एका रात्रीची किंमत किती? ‘का रे भ***व्या’ म्हणत अभिनेत्रीनेही शिकवला धडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here