सगळीकडे नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. पूर्ण दोन वर्षानी देवीचा धमाकेदार उत्सव होत असल्याने सामन्य नागगरिकापासून ते सेलिब्रिटीपर्यत हा सण साजरी करत आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देवीमध्ये दांडिया, गर्बा खेळत असतानाचे पोस्ट शेअर केले आहे. सध्या सोशल मीडिया ट्रेंड असल्यामुळे कोणीही फोटो काढल्याशिवाय कोणत्याच गोष्टी करत नाही. अशातच काही सेलिब्रटींनी देखिल देवीच्या आरतीसाठी हजेरी लवली आहे. ज्याच्या फोटोने सोशल मीडियावर धमाल केली आहे.
पूर्ण देश आज देवीच्या भक्तीमध्ये मग्न आहे. सामान्य लोकांपासून ते खास लोकांपर्यत हा सण खूपच दमदार पद्धतीने साजरी करत आहे. या शुभ दिवसांमध्ये काही बॉलिवूड कलाकार दुर्गा देवी पूजामध्ये सहभागी झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या पुजामध्ये अनेक मोठमोठे कलाकार उपस्थित होते. हा सगळा कार्यक्रम उत्तर मुंबई सर्बोजेनिन पंडालमध्ये पार हडला आहे. ज्याचे फोटो इंस्टग्रामवर तुफान व्हारल होताना दिसत आहे.
उत्तर मुंबई सर्बोजेनिन पंडाल या समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा दिवस धमाकेदार जल्लोषात साजरा केला आहे. या कार्यक्रमाला जया बच्चन (Jaya Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), राणी मुखर्जी (Rani Mukerji), काजोल (Kajol), अयान मुखर्जी (Ayan Mukerji), सुमोना मुखर्जी (Sumona Chakravarti), तनीषा मुखर्जी (Sumona Chakravarti), तनुजा (Tanuja), देबू मुखर्जी (Deb Mukherjee), सम्राट मुखर्जी (Deb Mukherjee), शरबानी मुखर्जी (Sharbani Mukherjee), जान कुमार सानू ( Kumar Sanu), अनुराग बसु (Anurag Basu), रेगो बंसल (rego bansal), जयदीप पटेल (jaydeep patel), इशिता दत्त शेठ (Ishita Dutta), वत्सल शेठ (vatsala dutt), ज्योती मुखर्जी (jyoti mukherjee),सारखे अनेक कलाकारांनी दुर्गादेवीच्या पुजामध्ये हजेरी लावली होती.
या कार्यक्रमामध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि राणी मुखर्जी, काजल यांच्या पुर्ण परिवारासोबत आले हते. मौनी रॉयने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये सिंपल मेकअपमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले. अभिनेता रणबीर कपूर यानेही या पुजामध्ये हजेरी लावली होती. त्याने दुर्गा देवीच्या दर्शनासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फिकट निळ्या रंगाचा जॅकिट घालून आला होता. यासोबतच अभिनेत्री जया बच्चनही लाल रंगाच्या साडीमध्ये ट्रेडिशनल अवतारामध्ये कोरोनाचे नियम पाळत तोंडाला मास्क लावून उपस्थित होती. सगळे सेलिब्रिटी एकमेकांसोबत फोटो काढताना दिसून येत होते. एत्र अनेक कलाकारंनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढून दिसत होती. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…
बापरे..! टायगर श्रॉफला नक्की झालंय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड काळजीत, कारणही आलंय समो