Tuesday, June 25, 2024

‘कॅटरिनाची काळजी घे भावा’, विकी आणि रणबीरच्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल या दिवसात कॅटरिना कैफसोबत लग्नाच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. तसेच, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या देखील चर्चा चालू आहेत. अशातच रणबीर कपूर आणि विकी कौशलचे असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यावर चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत.

नुकतेच सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने रणबीर कपूर आणि विकी कौशलचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघेही हसत बोलताना दिसत आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत, त्यात त्यांचा हा फोटो पाहून त्यांचे चाहते अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत. (Funny comments on Vicky kaushal and Ranbir Kapoor picture shared by viral bhayani on Instagram)

या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “विकीशी रणबीर- कॅटरिनाची काळजी घे भावा.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “माझी एक्स, तुझी पत्नी आहे. हाउज द जोश.” एकेकाळी रणबीर कपूर आणि कॅटरिना डेट करत होते.

त्यांच्या याच नात्यामुळे त्यांचे चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “विकी म्हणत आहे की, माझ्या लग्नात चन्ना मेरेया हे गाणे नको म्हणूस.” त्यासोबतच एकाने लिहिले आहे की, “सलमान खानला घाबरू नका.” एकेकाळी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या रिलेशनबाबत अनेक बातम्या येत होत्या. तसेच, ती रणबीर कपूरसोबत देखील रिलेशनमध्ये होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, कॅटरिना आणि विकी पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत, तर काही कारणांनी आलिया आणि रणबीरने त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे, परंतु अजूनही त्यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नाही.

रणबीर आणि कॅटरिना यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामध्ये ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘जग्गा जासूस’ आणि ‘राजनीति’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

हे देखील वाचा