Thursday, September 28, 2023

थांबतच नाहीये ‘Gadar 2’ची सुपरफास्ट एक्सप्रेस! चौथ्या दिवशीही बक्कळ कमाई करत भल्याभल्या सिनेमांना पछाडले

सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत असलेला हिंदी सिनेमा म्हणजे सनी देओल याचा ‘गदर 2‘ होय. हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यात यशस्वी झाला. सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच हा सिनेमा सातत्याने विक्रम मोडताना दिसत आहे. सिनेमाने ओपनिंग वीकेंडलाही जबरदस्त कमाई केली. सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) सिनेमाने शाहरुख खान याच्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’ सिनेमाचाही विक्रम मोडला. चला तर, सनी देओलच्या सिनेमाने चौथ्या दिवशी किती रुपयांची कमाई केली, पाहूयात…

‘गदर 2’ने सोमवारी किती रुपये कमावले?
सनी देओल (Sunny Deol) याचा ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा ब्लॉकबस्टर बनत चालला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने 134.88 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, सुरुवातीच्या अंदाजानुसार, सनी देओलच्या सिनेमाने सोमवारीही शानदार कमाई केली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘गदर 2’ सिनेमाची चौथ्या दिवशीची कमाई ही 38.70 कोटी रुपये आहे. यासोबतच ‘गदर 2’ सिनेमाने चार दिवसात एकूण 173.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘गदर 2’ने सोमवारच्या कलेक्शननंतर शाहरुख खान (Shahrukh) याच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचाही विक्रम मोडला आहे. आता पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘बाहुबली 2- द कन्क्लूजन’नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे. खरं तर, बाहुबली 2ने पहिल्या सोमवारी 40.25 कोटी रुपये कमावले होते. तसेच, सलमान खान (Salman Khan) याच्या ‘टायगर झिंदा है’ सिनेमा या यादीत 36.54 कोटींच्या कलेक्शनसोबत तिसऱ्या स्थानी घसरला आहे. या यादीत ‘पठाण’ सिनेमा 25.5 कोटींच्या कलेक्शनसह आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर असू शकतो.

स्वातंत्र्यदिनी ‘गदर 2’ जाणार 200 कोटींच्या क्लबमध्ये?
‘गदर 2’ सिनेमाच्या कमाईचा वेग पाहता स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सुट्टी असल्यामुळे जबरदस्त कमाई करण्याची आशा आहे. असे म्हटले जात आहे की, 15 ऑगस्ट रोजी सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल. ‘गदर 2’ आता बॉक्स ऑफिसवर दीर्घ काळ चालणारा सिनेमा बनत चालल्याचे दिसत आहे. या सिनेमाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारले आहे. (gadar 2 box office collection day 4 actor sunny deol ameesha patel movie collected 33 crore on monday)

महत्त्वाच्या बातम्या-
Bigg Boss OTT 2 Winner: एल्विश यादवने विजेतेपद पटकावत घडवला इतिहास, ट्रॉफीसोबत जिंकले ‘एवढे’ लाख
अंतिम फेरीपूर्वीच बिग बॉसमधील प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली

हे देखील वाचा