Sunday, October 1, 2023

‘गदर 2’ हिट होताच बदलला सनी देओलचा सूर! महिला चाहतीला दिलेल्या वागणुकीमुळे भडकले नेटकरी, पाहा कमेंट्स

सध्या बॉक्स ऑफिसवर एका हिंदी सिनेमाची चांगलीच चलती आहे. तो सिनेमा इतर कुठला नसून सनी देओल याचा ‘गदर 2‘ आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने कमाईचे विक्रम मोडले आहेत. सिनेमाने अवघ्या 3 दिवसातच 100 कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. 22 वर्षांनंतर या सिनेमाद्वारे सनी आणि अमीषा पटेल यांची जोडी ‘तारा सिंग’ आणि ‘सकीना’च्या भूमिकेत परतली आहे. चित्रपटगृहाबाहेरही चाहते तुफान गर्दी करताना दिसत आहेत. तसेच, सनी देओलला पाहण्यासाठी चाहते स्वत:ला रोखू शकत नाहीयेत. अशातच सनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावरून त्याला ट्रोल केले जात आहे.

नुकताच ‘गदर 2’ (Gadar 2) फेम सनी देओल (Sunny Deol) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्याने एका चाहत्यासोबत केलेले वर्तन सोशल मीडियावर नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाहीये. त्यामुळे नेटकरी सनी देओलवर संतापले (Netizens Furious With Sunny Deol) आहेत.

चाहत्यासोबतच्या वर्तनामुळे संतापले चाहते
एकीकडे सनी देओल ‘गदर 2’ सिनेमाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी चाहत्यांना धन्यवाद देत आहे. तसेच, दुसरीकडे त्याचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभिनेत्याचा बदललेला सूर चाहत्यांना आवडत नाहीये. सनी देओलचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सनी देओल बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी पोहोचला. याचवेळी एक महिला चाहती उत्साहाच्या भरात अभिनेत्याच्या जवळ जाऊन सेल्फी घेत असलेल्या व्यक्तीच्या मध्ये आली.

सनी देओलला या महिलेचा स्पर्श होताच अभिनेता मागे सरकला आणि त्याने तोंडावर बोट ठेवत तिला शांत राहण्याचा इशारा केला. मात्र, काही चाहत्यांना अभिनेत्याचे हे वागणे योग्य वाटले, तर काही युजर्सने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “मला ‘गदर 2’ इतकाही खास वाटला नाही.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “याचा ऍटिट्यूड तर पाहा, कशाप्रकारे तिच्यासोबत वागत आहे.” आणखी एकाने लिहिले की, “असं वाटतंय की, यश पचत नाहीये.” एकाने असेही लिहिले की, “असं वाटतंय, हा गरिबांचा तिरस्कार करतो.”

Sunny-Deol-Instagram

एकाने लिहिले की, “आला का घमंड. बॉलिवूडवाल्यांचा हाच प्रॉब्लेम आहे.” एका युजरने सनी देओलला प्रश्न करत म्हटले की, “सनी देओलतर असा नव्हता, गरिबासोबत एक फोटो घेतला असता, तर तुमचं काय गेलं असतं?”

Sunny-Deol-Instagram

‘गदर 2’ची कमाई
‘गदर 2’ सिनेमाच्या कमाईविषयी बोलायचं झालं, तर सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 134.88 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात हा सिनेमा लवकरच 200 कोटींचा टप्पाही पार करेल, असे बोलले जात आहे. (film gadar 2 actor sunny deol brutally trolled for his behavior with fan netizens called him arrogant see video)

महत्त्वाच्या बातम्या-
दलित समुदायाविषयी ‘ते’ विधान करून अभिनेत्याने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड! कडाडून विरोध होताच मागितली माफी
भारीच ना! तब्बल 4 वर्षांनंतर पाहायला मिळाला शाहरुखचा रोमँटिक अंदाज, ‘या’ गाण्यात नयनतारासोबत केला रोमान्स

हे देखील वाचा