Tuesday, June 18, 2024

भारीच ना! अभिनेता सनी देओलने केली ‘गदर २’ चित्रपटाची शूटिंग सुरू; दिग्दर्शकाने व्हिडिओ केला शेअर

तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटाची क्रेझ अशी होती की, प्रेक्षक ट्रकमध्ये प्रवास करत चित्रपटगृहात पोहचत होते. चाहते आजपर्यंत चित्रपटातील डायलॉग्ज विसरले नाहीत. या चित्रपटात एका बाजूला भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवण्यात आली होती, तर त्याचवेळी सकीना आणि तारा यांच्या सुंदर प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटात अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सकीना आणि सनी देओल (Sunny Deol) ताराच्या भूमिकेत होता. त्याचबरोबर, आता बऱ्याच वर्षांनंतर अमीषा पटेल आणि सनीची सुपरहिट जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर धडकणार आहे.

अमिषा आणि सनी ‘गदर’ अर्थात ‘गदर २’ (Gadar २) च्या सिक्वेलमध्ये एकत्र दिसणार आहेत. सनीने त्याच्या आगामी ‘गदर २’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना याची माहिती दिली आहे.

अनिल शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते चाहत्यांना सांगत आहे की, त्यांच्या टीमने ‘गदर २’ चे शूटिंग सुरू केले आहे. अनिल शर्मा यांनीही चाहत्यांना या चित्रपटासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. जेणेकरून तो बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचू शकेल.

‘गदर २’ या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा दिसणार आहेत. गदर हा सनीच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट आहे, ज्याच्या सिक्वेलसह त्याला चित्रपटगृहात पुन्हा इतिहास रचायचा आहे. चित्रपटाचा प्लॉट पहिल्या भागाप्रमाणे भारत-पाकिस्तानवर आधारित असेल. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तारा सिंग (सनी देओल) आपल्या मुलासाठी पाकिस्तानात पाऊल ठेवेल आणि त्यानंतर खरी कहाणी सुरू होईल.

‘गदर २’ हा चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यास मदत करेल. अनिल शर्मा त्यांच्या ‘गदर २’ वरही काम करत आहेत. संपूर्ण देओल कुटुंब पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा