×

‘गदर’ सिनेमातील छोट्या सरदाराला ओळखणेही झाले कठीण, जिंकतोय तरुणींची मनं

गदर: एक प्रेम कथा‘ २००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटाची क्रेझ अशी होती की, प्रेक्षक ट्रकमध्ये प्रवास करत सिनेमागृहात पोहोचत होते. चाहते आजपर्यंत या चित्रपटातील डायलॉग विसरले नाहीत. या चित्रपटात एका बाजूला भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवण्यात आली होती, तर त्याचवेळी सकीना आणि तारा यांच्या सुंदर प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटात अभिनेत्री अमीषा पटेल सकीना आणि सनी देओल ताराच्या भूमिकेत होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला २२ वर्षे पूर्ण होणार आहेत. इतक्या वर्षांत चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या लूकमध्ये बदल होणार हे मात्र नक्की. या चित्रपटातील छोटा सरदारचाही लूक आता खूपच बदलला आहे, जो तुम्हाला कदाचित ओळखताही येणार नाही.

‘गदर’ चित्रपटातील सनी (Sunny Deol) आणि अमीषा (Amisha Patel) यांचा ऑनस्क्रीन मुलगा चरणजीत तुम्हाला आठवतच असेल. चित्रपटात छोट्या सरदाराच्या भूमिकेत दिसलेल्या चरणजीतचे खरे नाव उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) आहे. लहान वयातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा हा बालकलाकार नुसता मोठा झाला नाही, तर तो खूप देखणाही दिसत आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटोही शेअर करत असतो. उत्कर्ष आता २७ वर्षांचा आहे.

View this post on Instagram

A post shared by Utkarsh Sharma (@iutkarsharma)

उत्कर्षचा जन्म २२ मे, १९९४ रोजी मुंबईत झाला आहे. विशेष म्हणजे तो ‘गदर एक प्रेम कथा’, ‘सिंग साहब द ग्रेट’ आणि ‘अपने’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर उत्कर्षच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. तिथे राहून त्याने चार वर्षे शिक्षण घेतले.

View this post on Instagram

A post shared by Utkarsh Sharma (@iutkarsharma)

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

यानंतर तो आपल्या मायदेशी परतला. त्यावेळी त्याच्या वडिलांनी ठरवले की, ते उत्कर्षला लाँच करतील. उत्कर्षने २०१८ च्या ‘जीनियस’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूड पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री इशिता चौहान होती. याशिवाय या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, नवाजुद्दीन सिद्दीकी, आयशा जुल्का, झाकीर हुसैन यांसारख्या दिग्गज कलाकारांचाही समावेश होता.

हेही वाचा-

Latest Post