Friday, July 12, 2024

गणेश आचार्याने ‘ऊ बोलेगा’ गाण्याची स्टेप दाखवल्यानंतर समंथा आणि अल्लू अर्जुनला हसणे झाले आऊट ऑफ कंट्रोल

मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया, बॉक्स ऑफिस सगळीकडे फक्त एका आणि एकाच सिनेमाची हवा आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘पुष्पा.’ दाक्षिणात्य भाषेतील हा सिनेमा साऊथमध्ये तुफान गाजत असताना दुसरीकडे नुकत्याच हिंदीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने हिंदीमध्ये देखील भरपूर लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमातील गाणी देखील खूपच गाजताना दिसत आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमधील ‘ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा’ (Oo Bolega ya Oo Oo Bolega) हे गाणे सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. समंथा आणि अल्लू अर्जुन यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे दाक्षिणात्य भाषेत आणि हिंदी भाषेतही खूप गाजत आहे.

‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा’ (Oo Bolega ya Oo Oo Bolega) या गाण्याच्या सेटवरच एक मजेशीर व्हिडिओ कोरिओग्राफर गणेश आचार्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गणेश आचार्य पुष्पा सिनेमातील कलाकारांसोबत दिसत आहे. पुष्पा सिनेमातील पडद्यामागील सीन असलेल्या या व्हिडिओमध्ये गणेश आचार्य या ‘ऊ अंटावा’ (Oo Antava) गाण्याची हुक स्टेप दाखवताना दिसत आहे. त्याच्या स्टेप्स पाहून समंथा आणि अल्लू अर्जुन हे हसताना दिसतात आणि गणेश आचार्यने सांगितलेल्या स्टेप करतात.

गणेश आचार्याने हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या आवडीच्या लोकांसोबत अजून एक हिट, सेटवर या दोघांसोबत सर्वात जास्त मजेशीर वेळ घालवण्याची संधी मला मिळाली.” ही पोस्ट गणेश आचार्याने अल्लू अर्जुन आणि समंथा यांना टॅग देखील केली आहे.

पुष्पा सिनेमासोबतच या चित्रपटातील ‘ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा’ हे गाणे देखील खूपच गाजत आहे. या गाण्यासोबतच ‘श्रीवल्ली’ ने देखील इंटरनेटवर धूम केली आहे. ‘श्रीवल्ली’ गाणे तर चार्ट बस्टरवर पहिल्या नंबरवर आहे. तर ‘ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा’ हे गाणे यूटुबवर दुसऱ्या नंबरवर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा