Friday, December 8, 2023

‘…मग हे वेडेचाळे कशासाठी?’, जेष्ठ्य कलाकारांच्या रिल्सवर निळू फुले यांच्या लेकीने मांडले मत

सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन आहे. जिथे अनेक जण आता आपली कला सादर करतात. परंतु आजकाल रिल्सचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे. सुरुवातीला हे रिल्स मनोरंजनापुरता होते. परंतु आज काल सगळ्यांना या रिल्सची सवय झाली आहे. यासोबतच आजकाल मराठी सिनेसृष्टीतील काही जेष्ठ कलाकार देखील सगळे भान विसरून हे रिल्स करताना पाहत आहेत. आता त्यांना त्यांच्या वयाचा देखील विसर पडला आहे. यावर आता दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक गार्गी फुले (Gargi phule)यांनी केला आहे परंतु तिने कोणाचेही नाव न घेता ही टीका केली आहे.

आजकाल कोणता सण असो किंवा काही असले तरी अनेक रिल्स वायरल होत असतात. आता गणेश उत्सवात देखील आमच्या पप्पांनी गणपती आणला. हे गाणे खूप ट्रेंड झाले होते. अनेक लहान मुलांनी यावरती रिल्स बनवले त्याचप्रमाणे अनेक मोठ्यांनी देखील यावर आणि अभिनय केला. या गाण्यावर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर आली ऐश्वर्या नारकर यांनी डान्स केला होता प्रेक्षकांना त्यांचा डान्स अजिबात आवडला नव्हता परंतु त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ डिलीट केला.

अशातच घाडगे फुले यांनी यावर आता त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. एखाद्याची कला लोकांसमोर सादर करायची आहे रिल्स आणि पोस्ट करत वारंवार कलाकार व्यक्त होत असतात. पण कधी कधी सीनियर लोकांच्या रिल्स पहिल्या की भीती वाटते, योगासन, छान गाणी इथपर्यंत समजू शकते. पण पावसात भिजताना, शॉट घालून भटकंती करताना, गणपती समोर उड्या मारताना आपल्या वयाचा त्यांना विसर पडतो का” कोणासमोर बरोबरी करायची आहे यांना? आणि हे जर काम मिळवण्यासाठी असेल तर काकू, आई आणि सासू, काका सासरे, वडील याच भूमिका करताना दिसतात हे मग हे वेडेचाळे करण्यामागे नक्की कारण काय असेल कुणी सांगेल का?”अशाप्रकारे त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.

परंतु त्यांनी कोणाचेही नाव न घेता निशाणा साधला आहे. गार्गी फुले यांनी याआधी ‘तुला पाहते रे’या मालिकेत मध्ये काम केले होते. या मालिकेतील त्यांचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. त्यानंतर त्यांनी ‘सुंदर मनामध्ये भरली’ या मालिकेत देखील काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दहावीत असताना अडल्ट वेबसाईटवर जान्हवी कपूरचा मॉर्फ फोटो झालेला व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केला अनुभव
अमिषा नाहीतर ऐश्वर्या होती ‘गदर’साठी पहिली निवड, ‘या’ कारणाने अभिनेत्रीने नाकारला सुपरहिट चित्रपट

हे देखील वाचा