Thursday, September 28, 2023

टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे झाले आई-बाबा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदची बातमी समोर येत आहे. टीव्ही जगतातील अतिशय लोकप्रिय जोडी म्हणजे गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी हे अखेर आई बाबा झाले आहेत. पंखुडीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. बाळांच्या आगमनामुळे त्यांच्या घरात अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. २६ जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंखुडीची डिलिव्हरी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankhuri Awasthy Rode (@pankhuri313)

पंखुडीने २५ जुलै रोजी एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला आहे. पंखुडीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. तिने एक खास फोटो आणि एक नोट शेअर करत ही बातमी सांगितली. पंखुरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले. “आम्हाला एका मुलाचा आणि मुलीचा आशीर्वाद मिळाला आहे. २५ जुलै २०२३ रोजी आम्हाला या जुळ्या मुलांची प्राप्ती झाली आहे. आमचे हृदय आनंद आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. आम्ही अत्यंत आनंदाने आमच्या चार सदस्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. सर्वांच्या आशीर्वादासाठी आणि शुभेच्छांसाठी खूपच आभारी आहोत.” पंखुरीच्या या पोस्टवर टीव्ही, बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच त्यांच्या फॅन्सने देखील शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांना लवकरच बाळांची झलक दाखवण्याची विनंती केली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी पंखुरी आणि गौतमने आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. पुढे पंखुरीने प्रेग्नेंट होण्यासाठी किती त्रास सहन केला असल्याचे देखील सांगितले. तिला काही कॉम्प्लिकेशन असल्यामुळे प्रेग्नसी राहत नव्हती. अखेर आता ते आई बाबा झाले आहेत.

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी फेब्रुवारी २०१८मध्ये लग्न केले. या दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची पहिली एकत्र असलेली मालिका म्हणजे ‘रजिया सुलतान’. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये ‘सूर्यपुत्र कर्ण’ या टीव्ही शोच्या सेटवर दोघे पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नाच्या पाच वर्षांनंतर ते आईबाबा झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
‘आम्ही तुमच्यामुळेच…’, Kargil Vijay Diwasच्या निमित्ताने अक्षय कुमारने काढली शूरवीरांची आठवण
‘मी बहिरी नाहीये…’ म्हणत जया बच्चन यांची पापाराझींवर आगपाखड, नेटकरी म्हणाले, ‘म्हणून आमचे रेखावर प्रेम’

हे देखील वाचा