Friday, April 19, 2024

‘कार्यक्रमांचे आमिष दाखवून महिनोमहिने घरात बसवून ठेवतात’ गेहना वशिष्ठने एकता कपूरवर केले गंभीर आरोप

टेलिव्हिजन आणि डिजिटल जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री गेहना वशिष्ठचे (Gehana Vasisth)  नाव गेल्या वर्षी एका कथित पॉर्न फिल्म रॅकेटमुळे चर्चेत आली होती. या प्रकरणात तिला तुरूंगाची हवाही खायला लागली होती. आता पून्हा एकदा गेहना वशिष्ठ चर्चेत आली आहे. यावेळी तिने प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माती एकता कपूरवर धक्कादायक आरोप केले आहेत. ज्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. हा सगळा वाद लॉकअप कार्यक्रमामध्ये गेहनाला घेण्यावरुन झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री गेहना वशिष्ठ उर्फ ​​वंदना तिवारीने बालाजी टेलिफिल्म्सच्या व्यवस्थापकीय संचालक एकता कपूरवर खळबळजनक आरोप केले आहेत. एकता कपूरची कंपनी बालाजी टेलिफिल्म्स आणि ऑल्ट बालाजी टेलिव्हिजन या कलाकारांना त्यांच्या कार्यक्रमांचे आमिष दाखवून महिनोमहिने घरात बसवून ठेवतात आणि नंतर त्यांच्या इच्छेनुसार करार न झाल्यास या कलाकारांचा करार रद्द करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. एकता कपूरच्या ‘लॉकअप’ या लोकप्रिय कार्यक्रमात स्वत:ला साईन केल्यामुळे आणि नंतर कार्यक्रमात न घेतल्याबद्दल गेहना वशिष्ठने हे आरोप केले आहेत. गेहना वशिष्ठच्या या आरोपांवर एएलटीबालाजीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही अद्याप काहीही स्पष्टिकरण आलेले नाही.

एकता कपूरच्या कंपनी बालाजी टेलिफिल्म्सने आपली डिजिटल कंपनी ALTBalaji च्या बॅनरखाली टेलिव्हिजन रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या सारखाच ‘लॉकअप’ शो बनवला आहे. चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत त्याची होस्ट आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रपट, टीव्ही आणि सोशल मीडियातील 16 वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांना शोमध्ये आणण्याची घोषणा करण्यात आली होती. एकता कपूरच्या स्वतःच्या OTT Alt Balaji सोबत, ते दुसऱ्या OTT MX Player वर देखील प्रसारित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकता कपूरचा रिअलिटी शो ‘लॉकअप’च्या फिनालेची तयारी सुरू आहे. याबाबत गेहनाने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता तिचा करार संपुष्टात आणल्याची माहिती देण्यात आली. या चार महिन्यांत तिला इतर कोणतेही काम करण्यास बंदी घालण्यात आली होती आणि ऑल्ट बालाजीनेही तिला काम दिले नाही. आपल्या आयुष्यातील चार महिने वाया गेल्याने गेहना खूपच अस्वस्थ दिसली आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

हे देखील वाचा