मनोरंजन क्षेत्रात सध्या लगीन सराई चालू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच टेलिव्हिजनवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतील विराट आणि पत्रलेखा ही पात्र निभावणारे कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्न मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे पार पडले आहे. सोमवारी (२९ नोव्हेंबर) नवरदेव नील उज्जैनला पोहोचला. सोमवारी हळदी, संगीत हे सगळे कार्यक्रम झाले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सात फेरे घेतले आहेत.
नील भट्टने त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नात नील ऑफ व्हाईट शेरवानीमध्ये दिसत आहे, तर ऐश्वर्याने लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातला आहे. यासोबत तिने खूप सुंदर ज्वेलरी परिधान केली आहे. लग्नाच्या वेशात दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत भलेही पाखीला विराटचे प्रेम मिळाले नाही, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला त्याचे प्रेम मिळाले आहे.
यावर्षी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. त्यांच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा मेहेंदीचा कार्यक्रम झाला, तेव्हा देखील ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत विराट आणि पत्रलेखा एकमेकांवर प्रेम करत असतात. मात्र, मध्येच पाखीचे लग्न विराटचा मोठा भाऊ सम्राटशी होते आणि विराटच्या आयुष्यात सई येते. आता त्याला अचानक सई आवडू लागली आहे, तरी देखील पत्रलेखा त्याचे प्रेम मिळवायचा प्रयत्न करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल
-ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल
-‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच