Sunday, April 28, 2024

डान्स पाहावा तर गोविंदाचाच! मुलगी टीनाबरोबर केलेला गोविंदाचा ‘हा’ डान्स पाहिलाय का?

बॉलिवूडचा नंबर वन हिरो गोविंदा सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टिव असतो. जरी गोविंदाचे चित्रपट काही काळ मोठ्या पडद्यावर खास कामगिरी करू शकले नाहीत, परंतु आजही त्याची फॅन फॉलोव्हिंग बरीच आहे. गोविंदाने केवळ अभिनयानेच नव्हे तर त्याच्या डान्सनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अलीकडेच गोविंदाचा, मुलगी टीनासोबतचा मजेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोविंदाने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या शॉर्ट व्हिडिओ क्लिपमध्ये टीना आणि गोविंदा गाण्यावर मस्ती करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बाप-मुलगी एका इंग्रजी गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये चाहत्यांना गोविंदाची 90च्या दशकातली स्टाईल पाहायला मिळाली. त्याचबरोबर टीना आहूजानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या व्हिडिओमध्ये गोविंदा आणि टीनाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत, ज्यामध्ये ते दोघेही खूपच आकर्षक दिसत आहेत. टीना वडिलांसोबत नाचताना, हसताना दिसत आहे. चाहते टीना आणि गोविंदाच्या या मजेदार शॉर्ट व्हिडिओचा आनंद लुटत आहेत आणि त्यावर जोरदार कमेंट्सही करीत आहेत.

अलीकडेच टीना आहूजाने घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्यामुळे बरीच चर्चा झाली होती. एका मुलाखती दरम्यान टीनाने स्वत: ला नेपो किड समजण्यास नकार दिला होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिने चित्रपटांसाठी कधीच वडिलांची मदत घेतली नाही. टीना म्हणाली, “मी माझ्या वडिलांकडून कधीही मदत घेतली नाही, म्हणून कोणीही मला ‘नेपो किड’ म्हणू शकत नाही. मला आतापर्यंत जे काही काम मिळाले, ते माझ्या टॅलेंटच्या बळावर मिळाले आहे.”

बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून स्टार किड्स लॉन्च होत आहे. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान, ईशान खट्टर यासारख्या स्टार्सवर घराणेशाहीचा टॅग लागला आहे. मात्र टीना स्वत: ला त्यापेक्षा वेगळी मानते. वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले, तर टीना आहूजाने कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटाने केली होती. याशिवाय टीना सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केले जातात.

हे देखील वाचा